Saturday, April 27, 2024

/

काँग्रेस रोडवरील अपघातात दुचाकीस्वार ठार

 belgaum

दुचाकी ऑटो रिक्षाच्या आमोरासमोरील अपघातानंतर  मागून येणाऱ्या ट्रकने दुचाकी स्वाराच्या अंगावरून गेल्याने एक जण ठार झाल्याची घटना काँग्रेस रोडवर दुसऱ्या गेटनजीक  सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोराप्पा पुजारी वय 22 रा. अंकलगी गोकाक असे या अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.सध्या काँग्रेस रोडवर दुरुस्ती काम सुरू असल्याने एकाच बाजूने रहदारी सुरू आहे दुचाकी आणि ऑटो रिक्षात आमोरा समोर टक्कर झाली त्या नंतर दुचाकीस्वार  बोराप्पा याचा तोल जाऊन उजव्या बाजूला पडला त्या नंतर मागून येणारी ट्रक त्याच्या अंगावर गेली त्यात एक जण ठार झाला.

घटने नंतर या रोड वर ट्राफिक जाम झाला होता लागलीच रहदारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत रहदारी सुरळीत केली.रहदारी दक्षिण पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.