एकेकाळी बेळगावचे जिल्हा पोलिस प्रमुख असलेले आणि त्यानंतर बेंगलोर येथे महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आयपीएस अधिकारी संदीप पाटील सध्या मंगळूर येथे पोलिस आयुक्त म्हणून काम करत आहेत.
निवडणूक ड्युटी वर असणाऱ्या पोलिसांच्या काळजीसाठी त्यांनी त्यांना लागणारे किट तयार करून घेतले आहेत. दोन दिवसाच्या निवडणुकीच्या ड्युटी वर पोलिसांना ज्या काही वस्तूंची गरज पडेल त्या वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे.
असे पंधराशे बॉक्स त्यांनी तयार करून घेतले असून निवडणूक ड्युटी वरील पोलिसांना ते वाटण्यात येणार आहेत. या उपक्रमाची राज्यात चर्चा सुरू आहे
संदीप पाटील यांनी पोलिस कमिशनर या नात्याने हाताखालच्या पोलिस अधिकाऱ्यांची घेतलेली काळजी सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे आणि राज्यातील पोलिस दलाने त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. बेळगाव मध्ये जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून काम करत असताना संदीप पाटील यांनी धडाडीचे काम केले होते. आजही बेळगावकर त्यांच्या कामाची आठवण काढतात. मंगळूर येते पोलीस आयुक्त म्हणून काम करत असतानाही त्यांनी राज्यात चर्चा होईल असा उपक्रम राबविल्यामुळे बेळगावच्या लोकांना त्यांचा अभिमान आहे.