बँक कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी लागल्याने मंगळवारी शहरातील अनेक बँकाना याचा फटका बसला होता परिणामी दोन बँका बंद होत्या.
मारुती गल्लीतील सिंडिकेट बँक आणि किर्लोस्कर रोड येथील बँक ऑफ महाराष्ट्रची बंद होती याचा त्रास बँकेच्या ग्राहकांना सहन करावा लागला.
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे 23 एप्रिल रोजी बेळगावात मतदान होणार आहे या मतदानासाठी अनेक शासकीय नोकरदारांना इलेक्शन ड्युटी घालण्यात आली आहे. मंगळवारी सिंडिकेट बँकेतील सर्वच स्टाफला इलेक्शन ट्रेनिंग साठी पाठवण्यात आल्याने सदर बंक बंद होती बँक प्रशासनाने बंद दरवाजावर सर्व कर्मचारी निवडणूक ड्युटीला गेले आहेत त्यामुळे बँक बंद राहील अश्या माहितीचा फलकच लावला होता अनेक ग्राहक फलक पाहून निराश होऊन परतत असल्याचे चित्र दिसत होते.
एकतर मंगळवारी अनेक बँका निवडणूक ड्युटी मुळे बंद होत्या त्यात बुधवारी महावीर जयंती मूळे बँकांना सुट्टी आहे तर याच आठवड्यात शुक्रवारी गुड फ्रायडे ची सुट्टी आहे त्यात रविवार सुट्टी त्यामुळे अधिक सुट्ट्या आलेत त्यातच कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी आल्याने लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.