होसुरमधील आठ नंबर शाळेच्या विद्यार्थ्यांचे ३९ वर्षांनी स्नेहमीलन पार पडले. यावेळी पन्नासहून अधिक विद्यार्थी आणि दहाहून अधिक शिक्षक उपस्थित होते.
मराठी मुलांची शाळा न. 8 होसूर, शहापूर बेळगावच्या विद्यार्थ्यानी एक वेगळा पायंडा पाडत तब्बल 39 वर्षानी शाळेतल्या 51 विद्यार्थ्याना आणि 10 शिक्षकाना एकत्र जमवून , भेटवून एक वेगळाच कार्यक्रम बेळगावच्या उदय भवनमध्ये बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी घडवून आणला. 80 च्या दशकातील शाळेतीलबामणे,नाशिककर,रेगे,भोसले,नाईक,मुतगेकर,चौगुले, पठाडे या शिक्षकांनी भाग घेतला.
आपल्या शाळेचे वैशिष्ट्य आणि वैशिष्टपूर्ण कलाकारांची कलाकारी अनुभवली.सर्वांनी गुरुजनांना दिलेला आदर, त्यांना वाकून नमस्काराची न विसरलेली रीत यामुळे वातावरण भावनामय झाले होते. सन 1973 ते 1980 च्या दरम्यान या शाळेत 1700 विद्यार्थी 1 ली 7 वि च्या वर्गात शिकत होते एकंदरीत 27 शिक्षकाना 1700 विद्यार्थी हॅंडल करावे लागायचे. प्रत्येक ईयत्तेच्या 4 तुकड्या होत्या. बेळगवमधील एक आदर्श शाळा म्हणून गणली जायची.
या शाळेने विद्यार्थ्यामध्ये लावलेली शिस्त,पाठांतर करण्याची लावलेली सवय,तोंडी पाढे मुखोद्गत करण्याचा पाठपुरावा,इंग्लीश भाषेचा घातलेला पाया आणि शिक्षकानी विद्यार्थ्यावर केलेले पुत्रवत प्रेम अशा अनेक प्रकारच्या शाळेतील संस्काराची आठवण विद्यार्थ्यानी केली. या संस्काराचा फायदा वा उपयोग रोजच्या व्यवहारिक आणि घरच्या जीवनात कसा होतो याची उदाहरणे देऊन शाळेबद्दल आणि शिक्षकाबद्दल आभार व्यक्त केले. शिक्षकानी सुद्धा शालेमधील आदर्श विद्यार्थी आणि साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे शिक्षक यांची सानुग्रह उदाहरणे विशद केली. आज मराठी शाळेची हालखीची परिस्थिती,पटसंख्या यावर चर्चा झाली.