राणी चन्नामा नगर येथील बंद घर फोडून 25 लाखाच्या घरातील किंमती ऐवज लांबविला आहे. डॉ राजशेखर चन्नगौडा पाटील (रा.राणी चननमा नगर) यांच्या घरी ही घटना घडली असून आज सकाळी उघडकीस आली आहे.
पाटील हे आपल्या पत्नी सोबत दि 16 रोजी सकाळी 10.30 वाजता घर बंद करून बंगळूरला गेले होते. आज सकाळी 8.15 वाजता वापस आले असता चोरट्यांनी घरफोडी केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी घरातील बेडरूमच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला असून कपाटातील एकूण 24 लाख 5 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. 670 ग्रामचे सोन्याचे दागिने व घड्याळे या इतर वस्तूंचा समावेश आहे.
उद्यमबाग पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.