Wednesday, September 11, 2024

/

राजधानीत शिवजयंती मिरवणुक उत्साहात

 belgaum

महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सव सोहळा, ढोलपथक, शाहिरी आणि मर्दानी खेळांसह राजपथावरुन मिरवणूक असा दिल्लीतील शिवजयंती सोहळा झाला आहे.
राज्यसभा सदस्य कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे या मिरवुणुकीत खास उपस्थित होते सकाळी महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव सोहळा झाला. दिल्लीतील शिवजयंती कार्यक्रमात ढोल पथक मराठी संस्कृती पहायला मिळाली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून यासाठी लोक आले होते. शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन फुलांनी सजवण्यात आले होते. दर वर्षी 19 फेब्रुवारी रोजी शासकीय शिवजयंती साजरी केली जाते त्याच धर्तीवर मागील काही वर्षा पासून छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकाराने दिल्लीत जोरात मिरवणूक काढली जात आहे.

Delhi

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते मात्र बेळगावात जशी मिरवणूक होते तशी कुठेच काढली जात नाही दिल्लीतील शिव जयंती मिरवणुकीत बेळगावातील अनेक जणांनी सहभाग घेतला होता.

सामाजिक कार्यकर्ते उद्योजक दत्ता जाधव यांच्या कुटुंबीयांनी देखील या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. जाधव यांच्या सह दिल्लीत नोकरीच्या निमित्ताने स्थायिक असलेले अनेक जण या क्षणाचे साक्षीदार झाले होते.दत्ता जाधव सध्या दिल्लीत असून ते आपल्या दिल्लीतील चिरंजीवाकडे गेले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.