बेळगाव तालुक्यातील एक मोठी ग्राम पंचायत असलेल्या मच्छे ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.अध्यक्षा पद्मश्री हुडेद यांच्या विरोधात 37 विरुद्ध 9 अश्या मतांच्या फरकांनी हा ठराव मंजूर झाला आहे. यामुळं विद्यमान अध्यक्षांना चांगलाच दणका बसला आहे यानंतर मच्छे ग्राम पंचायतीला नवीन अध्यक्ष मिळणार आहे.
गुरुवारी सकाळी ग्राम पंचायतीच्या कार्यालयात प्रांताधिकारी डॉ कविता योगप्पन्नावर यांनी विशेष बैठक घेतली त्यावेळी सर्व सदस्यांनी हात उचलून प्रस्तावाच्या समर्थनार्थ 37 सदस्यांनी तर विरोधात 9 सदस्यांनी मतदान केलं.गेली कित्येक वर्षे अध्यक्षा पद्मश्री हुडेद यांच्या विरोधात वातावरण होते.
ग्राम पंचायत अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती इतकेच काय तर लाच घेतल्या प्रकरणी त्यांच्या वर लोकायुक्त धाड टाकून पैसे घेतेवेळी रंगेहाथ पकडण्यात आले होते त्यामुळे त्यांना जेलची हवा देखील खायला लागली होती.
डेद यांना एका लोक प्रतिनिधीचा वरदहस्त होता त्यामुळे त्या अनेकदा बचावल्या होत्या शेवटी त्यांनी केलेला भ्रष्टाचार अंगलट आला आणि त्यांना हे पद गमवावे लागले. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समसमान मते झाल्याने चिट्टी उडवून त्यांनी हे अध्यक्ष पद मिळवलं होत पंचायतीत अनेक अवैध कारभार केल्याने भ्रष्टाचार केल्यानेच त्यांना पद गमवावा लागलाअशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.