Saturday, April 27, 2024

/

रिंग रोड जमीन संपादन रद्द करा:शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार  

 belgaum

बेळगाव शहराच्या चारी बाजूनी होणाऱ्या या प्रस्तावित रिंग रोडला विरोध दर्शविण्यासाठी बत्तीस गावातील हजारो शेतकऱ्यांनी रणरणत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.बैलजोड्या,बैलगाड्यासह शेतकरी आपल्या कुटुंबिया समवेत मोर्चात सहभागी झाले होते.रिंग रोड रद्द करा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची,रिंग रोड रद्द करा,जय जवान जय किसान अशी जोरदार घोषणाबाजी मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी केली.शेतकऱ्यांनी रिंग रोड रद्द करा मागणीचे फलकही आपल्या हातात धरले होते.सरदार ग्राउंड येथून सुरु झालेल्या मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे झाली.

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शेतकरी संघटना यांच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.कन्नड मराठी भाषाभेद विसरून शेतकरी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.शेतकऱ्यांसह बालक महिलांची उपस्थित देखील या मोर्चात लक्षणीय होती उन्हाची तमा न बाळगता अनेक शाळकरी विद्यार्थी महिला देखील घोषणाबाजी करताना दिसत होत्या.

 belgaum

Dc morcha

शेतकऱ्यांची पंधराशे एकर शेती जमीन संपादन करून बत्तीस किमी.चा रिंग रोड करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घाट घातला आहे .राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या संबंधी जमिनी संपादित करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे.भू संपादानाला विरोध दर्शविण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्याकडे हरकती दाखल केल्या आहेत.

Morcha dc

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील,जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील ,अँड. सुधीर चव्हाण,प्रा.आनंद मेणसे,प्रकाश मरगाळे,अँड.किसन येळ्ळूरकर,निंगोजी हुद्दार ,रयत नेते अप्पासाहेब देसाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.