Friday, April 26, 2024

/

बेळगावात १२ कोटी खर्चून नवीन रेल्वे स्थानक इमारत 

 belgaum
लोंढा-मिरज मार्गावर येणारे बेळगाव रेल्वे स्टेशन  महत्त्वाचे स्थानक आहे. १८८७ साली बांधण्यात आलेले हे स्थानक १३० वर्षाचे असल्याने जुनी इमारत पाडून दुसरे सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक सुविधा असलेले स्टेशन बांधण्यात येणार असल्याचे खा. सुरेश अंगडी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके, दक्षिणचे आ. अभय पाटील, नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अजय कुमार सिंग, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी, चेंबर ऑफ कॉमर्सचे महेश बागी, रोहन जुवळी, रेल्वेचे मुख्य अभियंता पाटील आदी मान्यवर, कोनशिला समारंभप्रसंगी उपस्थित होते.
महाव्यवस्थापक अजय कुमार सिंग यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले.नवे रेल्वे स्टेशन जुन्या इमारतीच्या जागेवरच बांधण्यात येणार आहे.

बेळगाव रेल्वे स्थानक देशातील ग्रेड तीन चे असून या स्टेशनवर दररोज 15 हजार प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात.1887 साली निर्माण करण्यात आलेले स्थानक असून 130 वर्षा पूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती.मिरज लोंढा दुपदरीकरण कामाच्या निधीतून 12 कोटी खर्चून इमारत बांधली जाणार आहे. अभियंते बकुळ जोशी यांनी या इमारतीचा प्रारूप आराखडा बनवला आहे.

अश्या असणार सुविधा

मुक्त वातावरणात फिरण्यासाठी फूट पाथ
मॉडर्न बुकिंग काउंटर
एकझुकेटीव्ह लॉंज
महिला पुरुष प्रवाश्यांना प्रतीक्षा गृह
हॉटेल
विश्रांती गृह
सरकता जिना

 belgaum

या शिवाय प्लॅट फार्म नंबर 1 रुंदीकरण केल जाणारअसून यावरून 2 व 3 प्लॅट फार्म वर जाण्यासाठी पादचारी पूल बनवले जाणार वाढत्या प्रवाश्यांची संख्या लक्षात घेऊन दक्षिण बाजूनी प्रवेशद्वार बनवले जाणार आहे गुडस शेड रोड माल वाहतुकीचे शेड सांबरा येथे हलवले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.