Saturday, April 27, 2024

/

२५ कुटुंबांची एकत्रित ओवाळणी!

 belgaum

दिवाळीत बहिणीकडून ओवाळून घेण्याला महत्व आहे. भाऊ किंव्हा बहिणी एकमेकाला भेटण्यासाठी या सणाला हमखास येतात आणि होते ती दिवाळीची ओवाळणी. बेळगाव तालुक्यात एका गावात एकाच घराण्याच्या २५ कुटुंबांची ओवाळणी एका वेळी होते आणि हा सोहळा बघण्यासारखा असतो.

Maha aarti
बेळगुंदी  गावात  हा सोहळा दरवर्षी साजरा करतात. शहापुरकर कुटुंबाने ही परंपरा जपलेली आहे. घरातील सर्व पुरुष एकत्र उभे राहतात आणि त्यांच्या बहिणी त्यांना ओवाळतात. ही ओवाळणी करताना गर्दी असते त्यामुळे घरा ऐवजी बाहेर थांबून ही परंपरा जपण्यात येते.
आजही ग्रामीण भागात अनेक घराणी अशाच पद्धतीने सण एकत्रित साजरा करतात. यावेळी कितीही दूर गेले तरी एकत्र येऊन आनंद वाटला जातो. एकत्र गोड फराळ खाऊन मग सगळे आपापल्या घरी निघून जातात.
घरे मोठी होतात, स्वतंत्र कुटुंबे थाटली जातात पण असे एकत्र सण करून गोडवा जपला जातो हे विशेष.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.