Tuesday, May 7, 2024

/

‘गोवावेस सर्कल बनलाय अपघात झोन’

 belgaum

बेळगावचे रहदारी पोलीस ‘विना हेल्मेट ट्रिपल सीट गाड्या पकडणे’ आणि ‘परगावच्या गाडया पकडून दंड वसूल करणें’ यात इतके व्यस्त आहेत की साधा अपघात झाला तरी अर्धा एक तास उशिरा पोचतात…असा आरोप दुसऱ्या कुणाचा नसून गोवा वेस सर्कल मधून ये जा करणाऱ्या वाहन चालकांचे आहेत.

गुरुवारी सकाळी याच गोवा वेस सर्कल मध्ये वर्दी आणि पॅसेंजर ऑटो मध्ये अपघात झाला त्यावेळी दोघां रिक्षा चालकात वाद निर्माण झाला अपघात स्थळीगर्दी जमली वातावरण तणावाचे होते अश्या परिस्थितीत पोलिसांना कळवण्यात आले मात्र अर्धा तास उशिरा पोलीस दाखल झाले होते.वास्तविक रित्या या चौकात रहदारी पोलीस नियुक्त करणे गरजेचे आहे मात्र याकडे काणाडोळा करण्यात आला आहे.लहान मोठ्या अपघाता वेळो भांडण गर्दी आणि ट्राफिक जाम हे विषय नेहमीचे बनले आहेत.

बसवेश्वर चौकाला गोवा वेस सर्कल असे देखील म्हटलं जाते शहरात असलेल्या चौका पैकी एक मोठा आहे या ठिकाणी चोवीस तास वाहनांची वर्दळ असते नेहमी छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत असतात अश्या स्थितीत पोलीस नियुक्त करून या ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची गरज असताना पोलिसांनी इकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय.

 belgaum

Gova ves circle accident zone

या चौकात महात्मा फुले रोड, रेल्वे स्थानक ब्रिज,शहापुरकडून मुख्य मार्ग आणि आर पी डी सह पहिल्या गेट कडून असे पाच रस्ते एकत्र मिळतात सगळीकडची वाहने येत जात असतात त्यामुळेच हा रस्ता गर्दीचा आणि लहान मोठ्या अपघातांचा केंद्र बनला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या चौकास अपघात झोन मुक्त करावे अशी मागणी केली जात आहे.

बेळगाव पोलीस सध्या चिरीमिरी मध्ये गुंतले आहेत अश्या समस्या कडे ते कधी लक्ष देणार?अश्या संतप्त प्रतिक्रिया या निमित्ताने उपस्थित होताहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.