Saturday, April 27, 2024

/

‘गुरुवारी देखील सुनावणी झालीच नाही’

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेच्या वॉर्डांची पुनर्रचना आणि आरक्षण बदलासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात घालण्यात आलेल्या दाव्याची सुनावणी गुरुवारी झालीच नाही. निवडणूक आयोगाने पुरवणी मतदारयादी तयार करण्यास सांगितले आहे तर अजून सरकारने आपले म्हणणे मांडलेले नाही यामुळे आजच्या सूनवणीकडे लक्ष लागले होते.

आजच्या तारखेला तरी मनपा व नगरविकास खाते आपली बाजू मांडेल अशी अपेक्षा होती दुपारी साडे तीन वाजता ही सुनावणी होणार होती दुपारच्या सत्रात 34 नंबर वर होती मात्र सुनावणी झाली नाही शुक्रवारी देखील सुनावणी व्हायची शक्यता कमी आहे त्यामुळे पुन्हा  पुढे गेलो असल्याची माहिती याचिकाकर्ते वकील धनराज गवळी यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.

गुरुवारी प्रलंबित सुनावणी न झाल्याने पुन्हा निवडणुकीचे भवितव्य अधांतरी राहिले असून पुढील 26 फेब्रुवारी पुढची सुनावणीची तारीख मिळाली आहे त्यामुळे  निवडणूक लोकसभा निवडणुकी नंतर होईल अशी शक्यता आहे.

 belgaum

मागील वेळी  न्यायालयीन कामकाज दुपारी होऊ न शकल्याने  पुढे गेली होती.
निवडणूक आयोग महानगरपालिका आणि नगर विकास  प्रशासनाने आपली बाजू मांडल्यानंतर उच्च न्यायालय याबद्दल निर्णय देणार आहे . पण दरवेळी पुढील तारखेपर्यंत वाट बघावी लागण्याचीच वेळ आली आहे.
सध्या उच्च न्यायालयाने महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती आणली असून जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत निवडणूक भवितव्य अंधारात आहे.

माजी नगरसेवक धनराज गवळी यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी नगरसेवकानी हा दावा दाखल केला आहे .महानगरपालिकेने अतिशय चुकीच्या पद्धतीने वॉर्ड पुनर्रचना केल्याचे त्यांचे म्हणणे असून या संदर्भात न्यायालयाने निकाल द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर आरक्षण बदल करताना सुद्धा चुकीचे निर्णय घेण्यात आल्याचा आरोप या दाव्यामध्ये आहे.यासंदर्भात न्यायालयाने महानगरपालिका नगर विकास प्रशासन आणि निवडणूक आयोगाला आपले म्हणणे मांडण्यास वेळ दिला पण अजून म्हणणे मांडलेलं नाही तर निवडणूक आयोगाने लवकर निकाल लावून निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा करा अशी मागणी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.