रोजगार उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ आणि कुचकामी ठरलेल्या पीडिओ आणि सेक्रेटरी विरोधात बेकिनकेरे येथील महिलांनी ग्राम पंचायतीला टाळे ठोकले. आम्हाला रोजगार द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात येत होती.
उधोग खात्री योजनेतून काम देण्यास असमर्थ ठरलेल्या पीडिओ आणि सेक्रेटरी यांच्या विरोधात वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांची बदली करण्यात आली नाही. याचा फटका येथील रोजगाराना बसत आहे. त्यामुळे आम्हाला रोजगार कधी भेटणार असा सवाल करत महिलांनी ग्राम पंचायतला टाळे ठोकण्यात आले.
पीडिओ आणि सेक्रेटरी गावात काम असताना देखील मुत्नाळ ग्राम पंचायत मध्ये काम देत आहेत, यामध्ये देण्यात येणारे वेतन तिकीट खर्चात वाया जात आहे. त्यापेक्षा गावात काम असून देखील ते उपलब्ध करून देण्याकडे पीडिओने साफ दुर्लक्ष करून रोजगाराची गैरसोय करण्यावरच भर दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले
मागील दोन महिन्यापासून या पीडिओ आणि सेक्रेटरी ची बदली करावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे त्यांची बदली करत नसल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला. ग्राम पंचायतला टाळे ठोकण्यात आल्याने सर्व व्यवहार बंद होते. महिलांची समजूत काढून त्यांनतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.