Tuesday, May 21, 2024

/

सरकारी शिवजयंतीला मराठीची कावीळ

 belgaum

बेळगाव शहरात सरकारी पातळीवर साजरी करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमात मराठीची कावीळ दिसली आहे. एरव्ही निवडणूक आली की मराठी बॅनर वापरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांना शिवरायांच्या जयंतीला मात्र मराठी भाषा चालत नाही हेच दिसले आहे. याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून सोशल मीडियावर याबद्दल प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
येथील सरकारी शिवजयंती कार्यक्रमात बोर्ड लावण्यापासून सगळा कार्यक्रमच कन्नड भाषेत झाला. मराठी माणसांना आमंत्रण सुद्धा नसताना सरकारी अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधींनी हा कार्यक्रम पार पाडला. शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेची पताका वाहीली त्या भाषेला आणि त्या भाषिक लोकांना दुजाभाव देऊन झालेल्या या कार्यक्रमाने मराठी मने सुखवण्यापेक्षा अधिक दुखावली आहेत.

Govt shiv jayantiबेळगावमध्ये कन्नड व मराठी असा भेद नाही पण मराठी भाषेचा अभिमान आहे हा अभिमान जर चांगल्या पद्धतीने जोपासला तर शिव जयंती सारखे कार्यक्रम करून काहीतरी साध्य होऊ शकेल पण सरकारी लोकांना याचे भान नसल्याचेच दिसून येते अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
शासकीय कार्यक्रमात कन्नड सक्ती केली असली तरी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमावेळी मराठी पोवाडे गीतांनी कार्यक्रमात जान आणली होती.

 belgaum

1 COMMENT

  1. तुम्ही बातम्या छान देताय. इकडे आमच्या साई कॉलनी मध्ये खुप नागरी समस्या आहेत. तरी आपण त्या सरकार समोर आणाव्यात, ही विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.