Monday, May 6, 2024

/

दोघां दागिने चोरट्यांना अटक 

 belgaum

दोन दागिने चोरट्यांना अटक करण्यात माळमारुती पोलिसांना यश आले आहे मारुतीचे पोलीस निरीक्षक बी आर गडेकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी रुक्मिणी नगर येथील मंजुनाथ कल्लाप्पा हलगती वय 21  व्यवसाय रद्दी पेपर विक्री रा.रुक्मिणीनगर, प्रशांत राठोड वय 22 व्यवसाय:गवंडी काम मूळ रामदुर्ग सध्या रा.रुक्मिणी नगर यांना अटक केली आहे.

पोलिसांनी त्यांच्या जवळील एक लाख 58 हजार किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत याशिवाय आरोपीकडून बजाज डिस्कवर दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.या प्रकरणी माळ मारुती पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.