सोमवारी सकाळी उघडकीस आलेला संतीबस्तवाड येथील युवकाचा केलेला निर्घृण खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.संतीबस्तवाड येथील माजी तालुका पंचायत सदस्य यल्लप्पा बिरुमती यांचा मुलगा विश्वनाथ यल्लप्पा बिरुमती (24)याचा निर्घृण खून झाला होता.
रविवारी रात्री त्याच गावातील युवकांनी त्याचा खून केला असल्याचे देखील पोलीस तपासात समोर झाले असून सात युवकांवर गुन्हा नोंद झाला आहे.
या प्रकरणी प्रशांत निडलगेकर,दुर्गेश मिडकनट्टी,बाबुराव बागेवाडी,रवी जड्डेमनी,गुरू कोलकार,राजू जड्डेमनी,सुरेश गुदली सर्वजण रा.संतीबस्तवाड यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.सर्व सात आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
मयत विश्वनाथ याने गेल्या दोन वर्षापूर्वी बाबू आणि रवी या आरोपीं विरोधात पोलिसात तक्रार केली होती त्यांचे जुने भांडण होते त्यातून हा खून झाला असल्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.