Monday, December 30, 2024

/

बेळगाव स्पोर्ट्स क्लबने जिंकली बी पी एल स्पर्धा

 belgaum

मोहन मोरे यांच्या मालकीच्या बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने सुश्रुत स्पोर्ट्स क्लबचा 40 धावांनी पराभव करत दहावी बेळगाव प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली. नितीन शिरगुकर पुरस्कृत बी पी एल स्पर्धेत शनिवारी युनियन जिमखाना मैदानावर अंतिम सामना खेळवण्यात आला त्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने विजेतेपद पटकावले आहे.

एकूण आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात सहा गडी बाद 185 धावा केल्या प्रत्त्युत्तर दाखल खेळताना सुश्रुत   स्पोर्ट्स क्लबने सर्व गडी गमावत 144 धावा केल्या.

Bpl bgm sports club

विजेत्या संघास दीड लाख रुपये तर उपविजेत्या संघास 75 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.सामनावीर पुरस्कार 82 धावा केलेल्या बेळगाव स्पोर्टस क्लबच्या परीक्षित कट्टी याला देण्यात आल्या तर मालिकावीर  पुरस्कार रोहित देसाई यांना देण्यात आला.पार्थ पाटील हा इम्पॅक्ट प्लेयर ऑफ दि सिरीज ठरला.

यावेळी नितीन शिरगुरकर प्रसन्ना सुंठणकर, दीपक पवार,नितीन भातकांडे आदींनी बक्षिसे वितरण केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.