Saturday, November 16, 2024

/

‘जळीत कुटुंबांना तालुका पंचायतीचा मदतीचा हात’

 belgaum

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत उघडया वर पडलेल्या दोन कुटुंबाना तालुका पंचायतीने देखील आधार दिला आहे.तालुका पंचायतीच्या वतीनं दोन्ही कुटुंबाना वस्ती योजनेतून प्रत्येकी एक घर आणि 25 हजार रुपये देण्यात येणार आहे.

तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील उपाध्यक्ष मारुती सनदी सदस्य सुनील अष्टेकर रावजी पाटील आदी सदस्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी आंबेवाडी येथील त्या जळीत घरांची पहाणी केली.

Tp member

गावडू यळगुकर विनोद यळगुकर या दोन्ही कुटुंबाना मदत देण्याचे आश्वासन दिले.गेल्या चार दिवसा पूर्वी शॉर्ट सर्किट मुळे आग लागून दोन्ही घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाल्या होत्या त्यामुळं दोन्ही कुटुंब रस्त्यावर आली होती.

अनेक सामाजिक संघटनानी लोक प्रतिनिधींनी पुढाकार घेत मदत सुरू केली आहे त्यामुळे तालुका पंचायतीने देखील याची दखल घेऊन मदतीचे आश्वासन दिलं आहे.यावेळी तालुका पंचायत सदस्या रेणुका सुळगेकर,मथुरा तेरसे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.