Saturday, December 7, 2024

/

‘गुडशेड रोडच्या बाजूने भिंत बांधा मगच उदघाटन करा’

 belgaum

खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिज चे काम अजून अर्धवट आहे. मात्र उदघाटनाची घाई लागलेले अधिकारी व कर्मचारी या अर्धवट कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. ब्रिज बांधून पूर्ण झाले पण गुडशेड रोडच्या बाजूने भिंत बांधण्यात आली नाही ही भिंत बांधूनच ब्रिज खुले करण्याची गरज आहे.

Rob
प्रकाश निर्मळे या गुडशेड रोड रोडवरील घर असलेल्या नागरिकाने बेळगाव live कडे आपली बाजू मांडली आहे.रेल्वे ओव्हरब्रिज चे काम अजून अर्धवट असून गुडशेड रोडच्या बाजूने भिंत न बांधता मातीची भर घालण्यात आली आहे. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होणार हा प्रश्न आहे.

बांधकाम  अर्धवट असताना उदघाटनाची घाई कशासाठी? हा त्यांचा प्रश्न आहे.  खासदारांशी भेट घेऊन माहिती दिली असून त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देतो असे सांगितले पण प्रत्यक्षात अजून अधिकारी लक्ष देत नाहीत याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.का लोकप्रतिनिधी उदघाटन करण्यासाठी घिडसाई करत आहेत ?स्थानिक लोकांच्या समस्या सोडवूनच उदघाटन करा अशी मागणी केली जात आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.