Wednesday, April 24, 2024

/

बॉडी डिसमॉर्फिक डिसॉर्डर- म्हणजे काय यावर उपाय काय?

 belgaum

आजच्या परफेक्शनच्या जगात प्रत्येक व्यक्तीला आपण परफेक्ट दिसावं आणि सगळ्यांनी परफेक्ट असाव असच वाटत असत. नुकतीच एका सिनेतारकेच्या निधनानिमित्त बरीच चर्चा झाली. तिने केलेली प्लास्टीक सर्जरी त्यामुळे झालेली कॉम्प्लीकेशन्स इत्यादी.. माणसाला हा असा हव्यास अगदी अनादी कालापासून आहे. परंतु त्याची परिणीती वेडात होत असेल तर त्याला वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच्या टीव्हीवरच्या जाहिराती आपल्याला त्वचेबद्दल, केसाबद्दल एकंदर शारीरिक ठेवणीबद्दल हे असेच पाहिजे तसचं दिसलं पाहिजे असे ठासून सांगत असतात. त्यामुळे कित्येक व्यक्तीमध्ये एकप्रकारचा न्युनगंड वाढीस लागतो. कित्येकांना आपला रंग, त्वचा, केस, बांधा अगदी नावडेनासा होतो. मनात कमीपणाची न्युनत्वाची भावना मूळ धरू लागते. त्यातून बॉडी डिसमॉर्फिक डिसॉर्डर सुरू होते.
बीएसडी मधे काही व्यक्तींना त्यांच्या शरीरातील काही भाग योग्य दिसत नाही असे वाटत असते. उदा. चेहरा, केस, पोट, मांड्या, पार्श्‍वभाग इत्यादी. तो भाग व्यवस्थित करण्यासाठी या व्यक्ती जंगजंग पछाडतात. परंतु तरीही त्यांचे समाधान होत नाही. आरशासमोर उभे राहून सारखेच केस विंचरणे ,सारखे चेहरा धुणे ,मेकअप करणे, त्वचा अरबाडणे ,चरबी जास्त आहे असे वाटून आपल्याच शरीराला इजा करून घेणे. असे ओसीडी आॅबसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर सारखे प्रकार होतात. घरातील कुटूंबियांनी, मित्रपरिवाराने समजूत घालूनही या रूग्णांचे समाधान होत नाही. सारखे कपडे बदलणे, केस विंचरणे, खूप मेकअप थापणे अशी लक्षणे दिसून येतात. नंतर नंतर समाजाला, कुटूंबियांना टाळणे असा प्रकार होऊन आजार विकोपाला जातो.

कारणे-
वयात येताना मानसिकतेवर आघात होणे ,पालकांनी; मित्रांनी हेटाळणी करणे, सहेतुक नाकारणे, शाळेत, कॉलेजमध्ये वर्ग मित्रमैत्रिणींकडून सतत चिडवले जाणे. काही वेळा मूलत्व मानसिक दोष असणे यामुळे हा आजार होवू शकतो. मायकल जॅक्सनचे उदाहरण सर्वश्रूत आहे. स्वतःचा चेहरा, नाक त्याने असे करून घेतले होते की मूळ चेहराच कोणाला समजू नये ! पांढरा फटक चेहरा, सततच्या प्लास्टीक सर्जरीने विदृप झालेले नाक यामुळे त्याची आवाजाची स्वतःची ओळख असूनही चेहरा मात्र लोप पावला होता. कित्येक सिनेतारका बोटाॅक्स व पीलर्स यांची मदत घेताना दिसतात. परंतु तोच कस अभिनयात लावताना कमी दिसतात.
लक्षणे-
माझ्याकडे एक मुलगी यायची तिला आपल्या केसाबद्दलच्या बी डी डी ने झपाटले होते. तासनतास आरश्यासमोर उभे राहून केस विंचरणे, हर तर्‍हेचा शांम्पू, तेल, कलर वापरणे. केस धुणे वाळवणे, विंचरणे यातच ती इतकी गुंतून गेली की विचारायची सोय नाही. असल्या वागण्यामुळे कुटूंबिय देखील वैतागले होते. आणि केस गळून तूटक झाले होते. तिचे पालक घाबरून तिला घेऊन आले होते. औषधाबरोबरच तिचे काऊन्सेलिंगही खूप करावं लागल. आता ती व्यवस्थित आहे. परंतु ती दोन वर्षाचा काळ तिच्या व तिच्या कुटूंबियांना खूप त्रासाचा ठरला.
उपचार-
ओसीडी व बीडीडी साठी कित्येकदा कठोर उपाय योजना करावी लागते. हा विकार वाटतो त्यापेक्षा खूप खोलवर रूजलेला असतो. त्यावर फ्लॉअरक्युअर खूप उपयुक्त आहे. पुष्पीवधी व होमिओपॅथी या दोहांनी हा आजार संपूर्ण कमी होण्यास मदत होते.
ठेविले असते तैसेची रहावे ही म्हण कालातीत आहे. शरीर सदृढ असण्याकडे भर द्यायला हवा. व्यायाम आहार कामाची पध्दत यामुळे शरीर घट्ट व कसदार होते. कृत्रिम उपाय हे जीवघेणे ठरू शकतात

 belgaum

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.