Saturday, May 11, 2024

/

उडान म्हणजे सर्वस्व नव्हे, अजूनही आव्हाने मोठी!

 belgaum

बेळगाव विमानतळाचा समावेश उडानच्या तिसऱ्या फेजमध्ये झालेला असून घोषणेची औपचारिकता बाकी आहे मात्र त्याचे श्रेय लाटण्यासाठी राजकीय नेत्यांनी आतापासून सुरुवात केली आहे. मात्र सद्य स्थिती पाहिल्यास उडान योजना यशस्वी करण्यास बेळगाव विमानतळाला अजूनही मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत.एक विमान सेवा सुरू झाल्यास त्या भागातील सर्वच थरातील लोकांचा फायदा होतो विकास होतो यासाठी शहराच्या विमान सेवेत वाढ होणे गरजेचे आहे.

खास दक्षिण भारतात विमान सेवेचे अधिक जाळ असणाऱ्या स्पाईस जेट सारख्या खासगी कंपन्यांकडे पुरेशी अशी विमाने नसल्याने बेळगावला ती कशी पुरविणाऱ? हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. मात्र राजकीय नेत्यांनी श्रेय न लाटता अधिक विमान कशी उतरवता येतील खाजगी कंपन्यांनी लिलावात सहभागी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

उडान ही योजना हे केवळ विमान उतरविण्याचे माध्यम आहे. ही एक एक सरकारची योजना आहे त्यात 500 की मी आकाश अंतरावर आणि एक तास वेळेत असलेल्या शहरांना सरकार विमान कंपनीला प्रत्येक तिकिट मागे सबसिडी देते. या योजनेत भाग घ्यायचे की नाही घेतले तर कितपत घेतले पाहिजे हे खाजगी विमान कंपन्या ठरवणार आहेत.बेळगावं शहराचा उडान योजनेत समावेश झाला त्यामुळे उद्या पासून अनेक विमाने उडतील अस काहीही नाही.उडान मध्ये समावेश म्हणजे ही पहिली पायरी आहे दुसरी पायरी म्हणजे खाजगी विमान कंपन्यांनी लिलावात सहभागी व्हायला हवं त्यासाठी दिल्लीत विमान कंपन्यांकडे राजकीय वजन वापरून त्यांना लिलावात सहभागी होण्याचे प्रवृत्त करणे होय.

 belgaum

Udan logo

पहिल्या फेज मध्ये हुबळी विमानतळाचा समावेश उडानमध्ये झाल्याने बेळगाव येथील स्पाईस जेटची पाचही विमान सेवा तिकडे हलविण्यात आली.बेळगाव येथे सुरू असलेली सर्व विमाने भरून जात असताना उडान चे नाव पुढे कडून ही सेवा तिकडे हलवली गेली वास्तविक पहाता कंपनी कडून बेळगाव हुबळी दोन्ही कडे सेवा सुरू करता आली असती मात्र कंपनीने कमी विमाने असल्याचे कारणही सांगितलं गेलं होतं.

इंडिगो एअर व्हेज ही नॉर्थ इंडियात अधिक विमाने सोडते तर तर स्पाईस जेट ही विमान सेवा साऊथ ला अधिक विमान सेवांचे जाळे अधिक आहे. त्यामुले एका या कंपनीच्या ताफ्यात कमीतकमी अनेक विमाने सज्ज पाहिजेत अशी स्थिती दोन्हीही कंपन्यात नाही अन्य लहान लहान प्रादेशिक विमान कंपन्याची देखील तीच अवस्था आहे
त्यामुळे उडान मधील विमान सेवा वाढवण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. स्पाईस जेट याचबरोबर इतर अनेक कंपन्या ही उडान मध्ये बेळगाव साठी सहभागी होणार आहेत.बेळगाव सह अन्य 15 शहर देखील उडान मध्ये जोडली जाणार आहेत त्यात या विमान कंपन्यांचे बेळगाववर किती लक्ष असणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे.

AIRport

उडान म्हणजे 2500 तिकीट आणि 500 की मी आकाशी अंतर ते पण एक तासाचा प्रवास. मात्र जरी बेळगावचा समावेश त्यामध्ये झाला तरी पुढे मात्र आपण पुन्हा खाजगी कंपन्यावरच अवलंबून असणार आहे.तब्बल 141 कोटी खर्च करून बेळगाव येथील विमानतळ उभे करण्यात आले आहे अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर वसलेल्या बेळगाव शहराला विमानोड्डाण प्राधिकारनाने येथून दिल्ली,मुंबई जयपूर आदी शहरांना विमाने झेप घेण्यासाठीच प्रयत्न झाले पाहिजेत.

एकीकडे गोवा विमानतळावर पार्किंगसाठी जागा नाही त्यामुळे मोफा मध्ये दुसरं विमानतळ बनवण्यात येत आहे ती रात्रीची विमाने बेळगावात पार्किंग करण्यासाठी काय अडचण आहे? जर पार्किंगसाठी येथे विमाने आणल्यास बेळगाव विमानतळाचे महत्व वाढणार आहे आणि विमान प्राधिकरनांचे उत्पन्न देखील वाढेल त्यामुळे येथील राजकीय व्यक्तीनी यासाठी का प्रयत्न करू नयेत, असे मत जाणकारांतुन व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.