Friday, March 29, 2024

/

त्या बँकेत नूतनिकरणाच्या नावाखाली लाखोचा भ्रष्टाचार

 belgaum

एका कर्मचारी महिलेच्या लैंगिक छळवणुकीचा मुद्दा गाजत असलेल्या त्या बँकेत नूतनिकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उघड होत आहे. बँकेच्या एक सोहळ्याच्या निमित्त करण्यात आलेले नूतनीकरण, त्यासाठी प्रत्यक्ष आलेला खर्च व चेअरमन व इतर काही संचालकांनी उडवलेला फंड याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
या बँकेच्या नूतनिकरणासाठी ७० लाखाचा फंड निश्चित करण्यात आला होता नंतर काही कारणांनी तो आणि ७ लाख रुपये वाढवण्यात आला. आपल्याच मर्जीतल्या एक कंत्राटदाराला काम देऊन बेळगावचे नव्हे तर मुंबईचे दर लावण्यात आले आणि प्रत्यक्षात फक्त ३० ते ३५ लाखांचे काम करून बाकीचे पैसे वाटून खाण्यात आले आहेत. अशी चर्चा आहे.
कमी खर्चात नूतनीकरण करा आणि शेअर धारकांना जास्त लाभ द्या अशी इतर संचालकांची मागणी होती पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बक्षीस वाटपासाठी असलेल्या ९० लाख राखीव निधीकडेही अशेंच दुर्लक्ष झाले असून स्वतःचे खिशे भरून घेण्यावर भर दिला आहे. इतर संचालक नाराज झाले आहेत.
नूतनिकरणाच्या कामात बँकेतील सर्व अंतर्गत केबिन्स मोठी करण्यात आली आहेत तर कॅश व इतर कौंटर्स वाढवण्यात आली आहेत. प्रत्यक्षात या कामाची गरज नव्हती. पूर्वी भाड्याने  एका बँकेला दिलेल्या जागेचं  नूतनीकरण झाले आहे. मुख्य बँकेत एटीएम कौंटर वाढवून चुकीच्या कारणासाठी पैसे खर्च करण्यात आले आहेत.
दोन माजी चेअरमन, विध्यमान वादग्रस्थ चेअरमन आणि उपाध्यक्षाने यात पैसे खाल्ल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून या लोकांचा भ्रष्टाचार उघड करावा आणि त्यांच्याकडून खाल्लेली रक्कम वसूल करण्याची मागणी काही जागरूक संचालकांनी केली आहे. या मागणीने गोंधळ उडाला आहे. प्रत्यक्षात दाखवलेला खर्च आणि प्रत्यक्ष झालेले काम याचा फरक तपासून योग्य तपासणी व्हावी अशी मागणी आहे.
यासंदर्भातील अधिक माहिती बेळगाव live कडे येत असून हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.