Tuesday, April 30, 2024

/

चूक कुणाची? सजा कुणाला?

 belgaum

‘बी एम डब्ल्यूच्या धडकेत युवती ठार- चिडलेल्या जमावाने पेटवली कार’ ही बातमी आज सगळ्याच माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. या घटनेत एका दुर्दैवी युवतीचा मृत्यू झाला आणि कारचालक किंव्हा मालक पोलीस केस मध्ये अडकला.
या घटनेची पार्श्वभूमी बघता चूक कुणाची याचा विचार कुणी केला काय? हा प्रश्न आहे. हायवे वरून गाडी जोरात चालवली जाते आणि हायवे कधीच ओलांडायचा नसतो. याचा विचार करायला नको आहे काय? त्या युवतीच्या मृत्यूने तिच्या नातेवाईकांना झालेल्या दुःखात सर्वजण सहभागी असतीलच पण हायवे ओलांडण्याची चूक कुणी करू नये हे कुणीतरी सांगायला लागणार आहे.
आझाद नगर कडून अमन नगरकडे हायवे ओलांडून जाणाऱ्या युवतीला सुसाट वेगाने जाणाऱ्या बी एम डब्ल्यू कारने जोराची धडक दिल्याने युवती ठार झाल्याची घटना पुणे बंगळुरू हायवेवर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. ती युवती अंडर पास किंव्हा ब्रिज खालूनही हा हायवे ओलांडू शकली असती. पण तिने हायवे वरूनच जाण्याचा निर्णय तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.

तहनियत वाहिद बिशती( वय 18) रा.आज़ाद नगर,मेन रोड बेळगाव असे न्यू गांधी नगर जवळ अपघातात मयत झालेल्या युवतीचे नाव आहे. अपघात होताच चिडलेल्या जमावाने बी एम डब्ल्यू कारची नासधूस करून गाडी पेटवली मात्र लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आणि कार चालकाला जमावा कडून वाचवले आहे. अपघात झाला की सारासार विचार न करता गाडीची नासधूस आणि चालकाला मारहाण करणे किती योग्य आहे याचा विचार नागरिकांनी केला नाही.
अपघात झाला की सरास असेच घडते. ,चूक कुणाची किंव्हा अपघात कसा झाला याचा विचार न करता जो कोणी ज्याच्या गाडीखाली जखमी झाला किंव्हा दगावला त्याला चोप देण्यापलीकडे नागरिक दुसरे काय करत नाहीत. अशा विचित्र मनोवृत्तीन्नी हात उचलण्यापूर्वी विचार करायला नको आहे काय?

Goa bmw burnt

 belgaum

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तहनीयात ही राष्ट्रीय महा मार्गावरून आझाद नगर कडून आपल्या लहान बहिणी सोबत अमन नगरकडे जात होती त्यावेळी भरधाव वेगाने जात असलेल्या बीएमडब्ल्यू कार GAO3 Z0678 ने तिला ठोकर दिली या अपघातात ती गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी लेक व्यु इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा काहीही उपयोग झाला नाही तिचे निधन झाले. या अपघातात मयत युवतीची लहान बहीण किरकोळ जखमी झाली आहे.
या अपघाता नंतर चिडलेल्या जमावाने कार ची मोडतोड करून आग लावली यावेळी तीथले वातावरण हिंसक बनले होते.कार गोव्याच्या आमदार पुत्राच्या मालकीची असल्याची माहिती मिळत आहे.
हे वातावरण हिंसक करून वेळ घालवलेल्यानी आता स्वतः थेट हायवे ओलांडणे थांबवून दुसऱ्यांना जागृत करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नाहीतर अशा घटना वाढत जातील. हायवे नियमानुसार त्यावरून फक्त मोठी वाहने जाण्याची परवानगी आहे, आणि धडक बसून कोणी दगावल्यास धडक देणार्यास चूक धरले जात नाही, पण ही घटना घडली तेंव्हा कुणी या नियमांचाही विचार केला नाही. याचाही विचार व्हावा.
घटनास्थळी माळ मारुती आणि रहदारी उत्तर पोलिसांनी पहाणी केली.अपघाताची नोंद रहदारी उत्तर तर कार वर हल्ला केल्याची घटना माळ मारुती पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
जी युवती दगावली तिच्या पालकांची काय चूक नव्हती त्यांना आधार मिळेल यासाठी प्रयत्न करतानाच यापुढे कुणाचीही मुले बाळे असा हायवे ओलांडण्याचा प्रयत्न करू नयेत याची काळजीही घ्यायला पाहिजे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.