स्पाईस जेट कंपनीच्या यादीत बेळगावचे नाव कसे काय हे पाहुन आज आश्चर्य वाटले. पण विमान उपलब्ध नसलेल्या यादीत हे बेळगावचे नाव होते.
याचवेळी स्पाईस जेट ची हुबळी मुंबई सेवा २८ ऑक्टोबर पासून बंद असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे हुबळीला प्रतिसाद मिळत नसल्याने हीच सेवा २९ ऑक्टोबर पासून बेळगाव मुंबई याप्रमाणे सुरू होण्याची शक्यता आहे.
गेल्या 17 मे पासून हुबळी ला उड्डाण योजनेत सामील केल्या पासून बेळगाव मुंबई ही सेवा स्पाईस जेट ने हुबळी ला स्थलांतर केली होती आता हुबळी मुंबईला प्रतिसाद मिळत नसल्याने हीच सेवा पुन्हा बेळगाव पासून सुरू व्हायची शक्यता निर्माण झाली आहे.
स्पाईस जेट ने नाकारलेल्या बेळगाव शहराला पुन्हा आपलेसे करण्याची तयारी सुरू केली आहे हे जाणवत आहे. यामुळेच हुबळी चे खासदार प्रल्हाद जोशी यांना ट्विट करावे लागले आहे.
आपण स्पाईस जेट च्या संपर्कात आहे त्यांनी हुबळी मुंबई ही सेवा बंद करू नये याचा प्रयत्न सुरू आहे. व्यावसायिक दृष्ट्या ते समाधानी नाहीत पण पुढे व्यवसाय वाढेल असे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे असे ट्विट मध्ये म्हटले आहे.
बेळगावच्या लोक प्रतिनिधींच्या प्रयत्नातून नव्हे तर बेळगाव मुंबईला मिळालेला प्रतिसाद पाहून मुंबई बेळगाव विमान सेवा सुरू व्हायची शक्यता निर्माण झाली आहे हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.