Saturday, April 20, 2024

/

‘बी एम डब्ल्यूच्या धडकेत युवती ठार- चिडलेल्या जमावाने पेटवली कार’

 belgaum

आझाद नगर कडून अमन नगरकडे हायवे ओलांडून जाणाऱ्या युवतीला सुसाट वेगाने जाणाऱ्या बी एम डब्ल्यू कारने जोराची धडक दिल्याने युवती ठार झाल्याची घटना पुणे बंगळुरू हायवेवर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

Goa bmw burnt

तहनियत वाहिद बिशती( वय 18) रा.आज़ाद नगर,मेन रोड बेळगाव असे न्यू गांधी नगर जवळ अपघातात मयत झालेल्या युवतीचे नाव आहे. अपघात होताच चिडलेल्या जमावाने बी एम डब्ल्यू कारची नासधूस करून गाडी पेटवली मात्र लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आणि कार चालकाला जमावा कडून वाचवले.

Goa bmw burnt
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तहनीयात ही राष्ट्रीय महा मार्गावरून आझाद नगर कडून आपल्या लहान बहिणी सोबत अमन नगरकडे जात होती त्यावेळी भरधाव वेगाने जात असलेल्या बीएमडब्ल्यू कार GAO3 Z0678 ने तिला ठोकर दिली या अपघातात ती गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी लेक व्यु इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा काहीही उपयोग झाला नाही तिचे निधन झाले. या अपघातात मयत युवतीची लहान बहीण किरकोळ जखमी झाली आहे.

Goa bmw burnt

या अपघाता नंतर चिडलेल्या जमावाने कार ची मोडतोड करून आग लावली यावेळी तिथले वातावरण हिंसक बनले होते.कार गोव्याच्या आमदार पुत्राच्या मालकीची असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी माळ मारुती आणि रहदारी उत्तर पोलिसांनी पहाणी केली.अपघाताची नोंद रहदारी उत्तर तर कार वर हल्ला केल्याची घटना माळ मारुती पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.