Thursday, April 25, 2024

/

भूतरामहट्टी अपघातातील जखमीचे निधन

 belgaum

थांबलेल्या राज्य परिवाहन मंडळाच्या सी बी टी बसला कांदे वाहू ट्रकने पाठी मागून जोराची धडक दिल्याने रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्याचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.यामुळे या अपघातात मयतांची संख्या दोन वर पोचली आहे

परशराम यल्लप्पा खोत वय 49 रा.भूतरामहट्टी असे या अपघातात ठार झालेल्या जखमीचे नाव आहे. पुणे बंगळुरू हायवे वर भूतरामहट्टी जवळ हा अपघात घडला होता त्यावेळी एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले होते.त्यातील जखमीचे इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झाले आहे.

सायंकाळी परशराम यांना जखमी अवस्थेत सिव्हिल इस्पितळात दाखल करण्यात आले होते त्या नंतर त्यांची रवानगी विजया इस्पितळात करण्यात आली होती इथेच त्यांच उपचार सुरू असताना निधन झालं आहे.या अपघातात ट्रक चालक देखील जखमी झाला असून त्याचे वर उपचार सुरू आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.