Monday, May 13, 2024

/

‘नेंम्मदी केंद्राच्या ग्लास फोडल्या’

 belgaum

भूमी उतारा मिळवण्यासाठी रांगेत थांबलेल्या दोन शेतकऱ्यांच्या गटात हाणामारी झाल्याने
नेंम्मदी केंद्राच्या काचेच्या ग्लास स्वाहा झाल्या आहेत.बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडली आहे.

Dc office

याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार भूमी उतारा काढण्यासाठी सकाळ पासूनच शेतकऱ्यांनी रांग लावली होती त्यात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती उतारा काढण्यासाठी मध्ये घुसला त्यावरून मोठा वाद निर्माण झाला त्याचे पर्यवसन हाणामारीत होऊन या कार्यालयाच्या खिडकीच्या ग्लास फुटल्या.

 belgaum

या घटने नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता घटनास्थळी लागलीच पोलीस दाखल झाले त्यांनी घटनेची चौकशी केली.घटना होताच काचा इकडे तिकडे पडल्या होत्या.

उतारा मिळवण्यासाठी गर्दी असताना अचानक मधल्या मध्ये नंबर नसताना उतारा देण्यात आला त्यावरून वाद निर्माण झाला असून या वादास तिथल्या कर्मचाऱ्यांचा आडमुठे पणा देखील कारणीभूत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.