belgaum

तळपायाची त्वाचा घट्ट खरखरीत होऊन गोल चट्टे तयार होतात. त्यांना कुरूप किंवा भोवरी म्हणतात. कुरूपाच्या ठिकाणाची त्वचा अतिशय जाड झालेली असते. ह्या लहान गोलाकार कुरूपांचा भाग कातडीच्या गोलाकार थरापर्यंत गेल्याने कुरूप अतिशय दुखते.
कारणे
अयोग्य प्रकारचे बूट- चप्पल घातल्याने त्वचा त्या तळपायाला सतत घासल्या जातात आणि या घर्षणाने कुरूपाचे दुखणे उद्भवते. काही व्यक्तींमध्ये सुयोग्य बूट- चप्पल घालूनसुध्दा शरीराची धारणाच कुरूप तयार करणारी असल्यास कुरूप उद्वतात.
लक्षणे- कुरूप सर्वसाधारणपणे पायाया बोटांच्या बेचक्यात किंवा तळपायावर होतात. निमुळत्या आकाराच्या कुरूपाचे टोक आतल्या बाजूला वळल्यासारखे असते. कुरूप हाताला घट्ट व टणक लागतात. काही वेळा रोगजंतूंच्या प्रादुर्भावाने झालेले दुखरे चामखीळ हेही कुरूप म्हणून समजले जातात.

bg

Kurup
उपचार
निसर्गोपचार
ज्येष्ठमध- कुरूप होते आहे असे लक्षात येताच ज्येष्ठमधाचा उपचार केल्यास उपयोगी पडतो. ज्येष्ठमधाच्या 3- 4 कांड्या उगाळून त्या तिळाच्या किंवा मोहरीच्या अर्धा चमचा तेलात मिसळून हे मिश्रण कठीण झालेल्या त्वचेला रोज रात्री चोळावे.
लिंबू- ताज्या लिंबाची चकती काढून दुखर्‍या भागावर घट्ट बांधुन रात्रभर ठेवावी.
पपई- कच्च्या पपईचा रसव दिवसातून तीन वेळा कुरूपावर लावावा.
हिरवे अंजीर- कच्च्या हिरव्या अंजिरात पांढरा दुधासारखा चीक असतो. हा रस दिवसातून दोन किंवा तीनदा कुरूपावर लावल्याने जुनाट कुरूपही बरे होतात.
खडुची भुकटी- बारीकशी खडुची कांडी वा तुकडा कुटून त्याची भुकटी पाण्यात कालवून लावावी.
होमिओपॅथी
निसर्गोपचार करण्याने कुरूप अलगद कमी होतात परंतु त्याचा अंश त्वचेमध्ये राहतोच. तर ही धारणा मुळापासून नष्ट करण्यासाठी होमिओपॅथी अत्यंत उपयुक्त आहे. आठ वर्षांची सीमा नावाची मुलगी अगदी नाजूक आणि गोरीपान परंतु तिला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच कॉर्नस होत होते. इतर कोणताही त्रास नाही परंतु कॉर्नसमुळे पाऊलही नीट ठेवता येत नव्हते. तर अशावेळी तिला होमिओपॅथीक औषधं दिल्याने कॉर्नस येण्याचे पूर्णतः बंदर झाले. आज ही सीमा सतरा वर्षाची आहे परंतु पुन्हा तिला कॉर्नसचा त्रास झालेला नाही.
सल्फर- गंधकावर शक्तीकरणाची प्रक्रिया केल्यामुळे हे एक अत्युत्तम औषध बनते अयोग्य पादत्राणे घातल्यावर होणार्‍या कुरूपांवर हे एक उत्कृष्ट औषध आहे.
हायड्रास्टीस- पायाच्या बोटांवर होणारे कुरूप कॉर्नकॅप लावल्यावर किंवा कापून काढल्यावर पुनः पुन्हा उद्भवणारे कुरूप यावर उपयुक्त.
ग्राफायटीस- तळपायावर खूप भेगा पडलेल्या असून अधेमधे कुरूप तयार होतात. रूग्णास बध्दकोष्ठतेचा त्रासही असतो.
अँटीमक्रुड- दुखरे कुरूप सोलवटून जात राहते. परंतु अतिशय त्रासदायक पांढरट पापुद्रे निघत राहतात. वाचकांनी फक्त अशी माहिती वाचून स्वयंउपचार करू नयेत. कारण होमिओपॅथीक औषध ही दुधारी शस्त्रासारखी असतात. व्यक्तीची अनुकूलता, प्रतिकारशक्ती, इतर तक्रारी शारीरिक, मानसिक ठेवण, स्वभाव यांची पडताळणी होऊनच होमिओपॅथिक औषधं ठराविक डोस व शक्तीनुसार देता येतात.
इतर
पावलांची स्वच्छता ठेवावी. सुटसुटीत बूट किंवा चप्पल वापरावेत. आठवड्यातून एकदा फूटबाथ घ्यावा. एका छोट्या टबमध्ये कोमट पाणी घेऊन लवेंडर ऑईलचे दोन थेंब घालून त्यात पावलं बुडवून ठेवावीत. नंतर मऊ टॉवेलने पाय पुसून फूटक्रीमने मसाज करावा. त्यामुळे त्वचा मऊ व टवटवीत राहते.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.