Wednesday, November 20, 2024

/

पुरळ (नायटा)-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

शरीराच्या बाह्यांगावर अर्थात त्वचेवर कोठेही जंतूचा संसर्ग होऊन कातडीची आग होते आणि पुरळ किंवा पाण्याने भरलेल्या लहान पुळ्या येतात. हा आजार बर्‍याच जणांमध्ये आढळतो. ह्या आजाराची वेगवेगळी रूपे असतात. क्वचित या पुरळावर फंगल इनफेस्टेशन (बुरशी) होऊन हा विकार वाढू शकतो. असह्य खाज व चिकटपणा असे विकाराचे स्वरूप असते.
कारणे व लक्षणे
आपल्या शरीरातील सर्व संस्था वेगवे कामे करतात. उत्सर्जन संस्था शरीरात तयार झालेले उपद्रवी व विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे कामही करीत असतात. अशा या नैसर्गिक पध्दतीत काही बिघाड झाला की हा आजार होतो. बध्दकोष्ठता, पोषक द्रव्यांची कमतरता, स्त्रियांमधील मासिक पाळीचा ताण, मानसिक ताण नैराश्य, रोग- असूया अशा कारणांमुळे त्वचेवर रॅश येते. काही औषधांच्या दुष्पपरिणामांनी सुध्दा अंगावर पुरळ खाज येते. अलीकडे चिकुन गुनिया या विकरातसुध्दा संपूर्ण अंगावर अशी रॅश येते.

Rush
प्रथम त्वचा लालसर होऊन सुजते. त्यानंतर गोवर आल्यासारखी रॅश येते. त्यात पाणी होते. क्वचित हे फोड कोरडेच असतात ओलसर असल्यास पुरळ फुटून त्यातून पाणी येते. चट्ट्यावर पापुद्रा चढल्यासारखे दिसते. रात्रीच्या वेळी पुरळ वाढून असह्य खाज येते.
निसर्गोपचार
करडईचे तेल- शरीरातील लिनोलेईक आम्लाच्या कमतरतेमुळे शरीरावर पुरळ उठतात. यासाठी करडई तेल दोन टेबलस्पुन रोज पोटात घ्यावे.
नाचणी- पुरळांवर नाचणीच्या पानांचा रस लावल्याने दाह कमी होतो.
काकवी- नायटा कमी करण्यासाठी दोन चमचे काकवी एक ग्लास दुधातून दिवसाला दोनवेळा घ्यावी.
पुरळाची जागा स्वच्छ रहावी म्हणून कडुनिंबाची पाने पाण्यात उकळवून त्या पाण्याने त्वचा पुसून घ्यावी किंवा हळद पाण्यात उकळवून ते पाणी वापरावे. रूग्णाने स्वच्छ हवेत फिरावे. घट्ट कपडे घालू नयेत. दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यावे, दोन वेळा स्वच्छ आंघोळ करावी.
होमिओपॅथी- नायटा विकार एकच असला तरी व्यक्तीनुसार त्याची रूपे वेगवेगळीच असतात. त्याकरिता होमिओपॅथी सर्वोत्कृष्ट आहे. विविध नमुन्याच्या औषधांनी विकार पूर्णतः बरा होतो. पाहुया औषधांची काही उदाहरणे.

Dr sonali sarnobat

संपर्क डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 08312431362

सरनोबत क्लिनिक08312 431364

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.