Thursday, March 28, 2024

/

‘तेरी मेहरबानिया’……

 belgaum

१९८५ च्या दशकात ‘तेरी मेहरबानिया’ नावाचा चित्रपट धूम माजवून गेला, त्याच कथानक होत ते एका कुत्र्यावर आधारित.
असाच एक कुत्रा बेळगाव मधील एपीएमसी पोलिस स्थानकात,अख्ख्या पोलिस स्टेशनचा लाडका झालाय. तो केवळ लाडका नाही तर रात्रीच्या वेळी तो पोलिसांबरोबर पेट्रोलिँग (गस्त) करतो. त्यामुळे बेळगाव शहरात हा औत्स्युक्याचा विषय बनलाय.
बघुया तर हा कुत्रा पोलिसांचा पाठीराखा झाला तरी कसा…
एपीएमसी पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर कालीमिर्ची यांना आठ महिन्यापूर्वी लहान असलेली कुत्र्याची पिले मिळाली. ती त्यांनी पोलिस स्टेशन मध्ये आणली. त्यापैकी एकाचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर ह्या उरलेल्या एका पिलाचा सांभाळ या पोलिस स्टेशनच्या सर्व पोलिसांनी केला. दररोज त्याला घरच जेवण, बिस्किटं देण्याच काम इथले पोलिस करतात. याच सगळं श्रेय जात ते इथल्या इन्स्पेक्टर कालीमिर्ची यांना….

J m kalimirchiकारण, एक संवेदनशील मनाचा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कॉलेज जिवनापासून त्यांच कुत्र्यावर खूप प्रेम. या प्रेमापोटीच ह्या पिलांना त्यांनी पोलिस ठाण्यात आणलं होत. हे पिल्लू आठ महिन्याच असून आत्ता पोलिसांचा पाठीराखा म्हणून त्याची ओळख झाली आहे.
हा कुत्रा पोलिसांसोबत रात्री गस्त घालतो, रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनची राखण करतो, संशयास्पद काही आढळल्यास रात्री भूंकतो. कुत्रा हा प्राणी मालकाप्रति इमानदार म्हणून ओळखला जातो. याच इमानानं तो आपल्या मालकाचं रक्षण करतो आहे. इन्स्पेक्टर कालीमिर्ची गेल्या सहा वर्षापासून बेळगाव मध्ये कार्यरत आहेत. धर्मानं मुस्लिम असले तरी पोलिस ठाण्यात त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. मानवतेच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीकडे पाहणाऱ्या या अधिकाऱ्याची या कुत्र्याच्या निमित्तानं सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे अन ते या रियल  लाईफ मधले जॅकी श्रॉफ बनले आहेत.इंग्लिश पालतू कुत्र्यांसोबत गावठी कुत्र्यांची जात देखील मालकाशी प्रमाणिक असतात हे देखील यामुळं अधोरेखित झालंय.

कालीमिर्ची यांनी केलेले उपकार,त्याचं केलेलं जतन हा इमानी कुत्रा विसरणार नाही तो दररोज स्टेशन मध्ये आल्या गेल्यावर कायम त्यांच्याकडे जात असतो मग कालीमिर्ची त्याला प्रेमानी कुरवाळत असतात…केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून तो मुका इमानदार प्राणी मनातल्या मनात असंच म्हणत असेल..’तेरी मेहरबानिया’…

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.