Wednesday, April 24, 2024

/

‘सन्मान समोर दुचाकी कार अपघातात बालक ठार’

 belgaum

दुचाकी क्रॉस करतेवेळी समोरून येणाऱ्या कार आणि दोन दुचाकीच्या मध्ये झालेल्या अपघातात एक नऊ वर्षीय बालक जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना कॉलेज रोड वर सोमवारी सायंकाळी घडली आहे.

अकमल मुश्तफा शेख वय 7 रा.श्रीनगर बेळगाव  हा बालक ठार झाला आहे तर अशोक अनिल शेरी वय 31 रा.कोनवाळ गल्ली जखमी झाला आहे. सायंकाळी साडे पाच च्या दरम्यान हा अपघात घडला आहे.रहदारी पोलीस निरीक्षक आर आर पाटील यांनी बेळगाव live ला दिलेल्या माहितीनुसार संभाजी चौकाकडून चन्नम्मा चौकाकडे भरधाव वेगाने कार जात होती त्यावेळी दुचाकी सरदार मैदानाकडून दोन दुचाकी सन्मान कडे रोड क्रॉस करतेवेळी हा अपघात घडला आहे.

College road accident

 belgaum

कारने दुचाकीला जोराची धडक देताच दुचाकीवर मागे बसलेला अकमल कार च्या खाली सापडला कारने डीवाईडर पर्यंत धडक दिली त्यात मागे बसलेल्याचा मृत्यू झाला तर गाडी चालवनारा किरकोळ जखमी झाला तर अन्य एक दुचाकी स्वार अनिल जखमी झाला असून त्याच्यावर  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात होताच संपूर्ण कॉलेज रोड वर ट्रॅफिक जॅम झाली होती लागलीच घटनास्थळी ट्रॅफिक उत्तर पोलीस निरीक्षक आर आर पाटील यांनी भेट देऊन रहदारीतील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले.अपघात पहाण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती त्यामुळं वाहनांच्या रांका लागल्या होत्या.

बघ्यांनी ट्रॅफिक जॅम करू नये

बेळगावात या चार दिवसात ट्रॅफिक जॅम चा फटका वाहन चालकांना बसला आहे  गेल्या आठवड्यात दिवशी निपाणी तवंदी घाटात गॅस ट्रक पलटी झाल्याने काल रविवारी हत्तरगुंजी जवळ खानापूर रोड वर अपघात ग्रस्त ट्रक न काढल्याने तर आज सोमवारी सन्मान हॉटेल जवळ अपघातामूळ जॅमचा फटका बसला होता.कोणताही अपघात घडल्यास बघ्यांनी संयम पाळायला हवा ट्रॅफिकला अडथळा करू नये असे आवाहन पोलीस खात्या तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.