स्थानिक स्वराज्य संस्थातून यु जी डी ची कामे व्यवस्थित पूर्ण झाली नाहीत असे आरोप होताहेत यावर नियंत्रण आणण्यासाठी तालुक आणि जिल्हा स्तरावर लवकरच कमिट्या स्थापन केल्या जातील अशी माहिती नगर प्रशासन मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली . शनिवारी सकाळी सुवर्ण विधान सभेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकास आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांच्या सह अन्य अधिकाऱ्यांनी सहभाग दर्शवला होता.
सांडपाणी निचरा व्यवस्थेशी संबंधित विभागानी कामे अर्धीवट केलेली आहेत अश्या तक्रारी आल्या आहेत या संदर्भात मुख्यमंत्री आणि चीफ सेक्रेटरी यांच्याशी चर्चा करून प्रभारी कमिट्या नेमल्या जातील असेही त्यांनी नमूद केल.
कोणत्याही शासकीय योजनेतील कामे राबवण्यात बेळगाव सह राज्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतही मुलाहिजा न ठेवता कारवाई म्हणून बदली केली जाईल असा इशारा दिला . नगर प्रशासन खात्याचे सचिव के पी मोहन राजू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थातून सुरु असलेल्या एकूण ६४७ कामा पैकी ९७ टाके कामे पूर्ण झाली आहेत अशी माहिती देत केवळ १९ कामे पूर्ण व्हायची शिल्लक आहेत अशी माहिती दिली.
कॅटोन्मेंट बोर्ड बद्दल १५ दिवसात निर्णय शक्य
बेळगाव छावणी सीमा परिषदेस राज्य सरकारचे अनुदान देण्या बाबत राज्य अर्थ विभागा कडून चर्चा केल्यावर निर्णय घेतला जाईल . आगामी १५ दिवसात यावर निर्णय देऊ असे देखील सचिव के पी मोहन राजू यांनी स्पष्ट केल. बेळगाव छावणी सीमा परिषदेच्या अध्यक्षा दिव्या शिवराम यांनी बैठकीत कॅटोन्मेंट बोर्ड अनुदान देण्याची मागणी केली.