Thursday, March 28, 2024

/

‘ऑस्ट्रेलियात शिकणार माजी महापौरांची कन्या’

 belgaum

माहिती आणि तंत्रज्ञान(information technology)या विषयात एम. इ. करण्यासाठी माजी नगरसेवक आणि माजी महापौरांची कन्या ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेणार आहे.
माजी महापौर नीलिमा चव्हाण आणि माजी नगरसेवक संभाजी चव्हाण यांची कन्या ऐश्वर्या चव्हाण हिला आर एम आय टी (royal melbourn institute of science ) दोन वर्षीय कोर्स एम एस करण्यासाठी दाखल मिळाला आहे.माहिती तंत्रज्ञान विषयात मास्टर डिग्री करणार आहे.आगामी ११ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाला रावण होणार असून दोन वर्षे मेलबॉर्न मध्ये राहून उच्च शिक्षण शिक्षण घेणार आहे.

aishwarya chavan
ऐश्वर्या ही लहान पणा पासूनच एक हुशार विद्यार्थिनी होती तिचे माध्यमिक शिक्षण डी पी स्कुल तर पी यु सी जी एस एस सायन्स मधून माहिती आणि तंत्रज्ञान मधून जैन कॉलेज मधून तिने बी इ केले आहे. त्या नंतर पुणे येथील टेक महिंद्रा कंपनीत तिने काही कालावधी साठी नोकरी केली होती.
ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीत दाखला मिळाल्याच्या यश बद्दल ऐश्वर्याचा मराठा जागृती संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. वडगाव येथील पटवर्धन ले आऊट मध्ये बिर्जे सभागृहात सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. नंदिनी चौगले,प्रा, विद्या टोपीनकटटी ,वृद्धा तडकोड ,धनश्री बरगे यांच्या वतीने शाल श्रीफळ स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्षा बिर्जे होत्या. यावेळी मराठा जागृती निर्माण संघाचे गोपाळराव बिर्जे,अनंत लाड,माजी नगरसेवक नेताजी जाधव,माजी नगसेवक संभाजी चव्हाण,माजी महापौर नीलिमा चव्हाण,जयदीप बिर्जे आदी  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.