Friday, March 29, 2024

/

अत्यावर्त-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

मासिक पाळीमध्ये होणारा रक्तस्राव हा जास्तीत जास्त 50-80 मि.ली. असतो.  अगदीच जास्त म्हणजे 100 मि.ली पर्यंत होऊ शकतो. तर अत्यार्तव म्हणजे मासिक स्राव बरोबर महिन्याने ठराविक वेळीच सुरू होतो. परंतु स्राव मात्र अतिशय होत असतो. अर्थात हा विकार म्हणजे लक्षण असून कारणे मात्र वेगवेगळी आहेत.

कारणे

1. मानसिक ताण, भावनिक उतार चढाव, चिंता इ.

 belgaum

2. गर्भाशयात गाठ किंवा मांस वाढणे

3. गर्भाशय व इतर अवयवांना सूज येणे

4. स्त्रीबीज ग्रंथीचे विकार

5. थॉयराईड ग्रंथीचे अतिरिक्त स्राव

6. गर्भनिरोधक- कॉपर टी व इतर गर्भनिरोधकांच्या वापरामुळे अत्यावर्ताचा त्रास होऊ शकतो.

7. हार्मोनल- इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरींन यासारख्या हार्मोन्समधील असमतोल.

8. राजोनिवृत्ती- (मेनोपॉज) मुळे काही स्त्रियांना असा त्रास होऊ शकतो.

DR sonali sarnobat

लक्षणे- मासिक पाळी वेळच्यावेळी येत असली तरीही अंगावर मात्र खूपच जाते. पोटात दुखण्याचे प्रमाण अल्प असते. परंतु सतत जास्त स्राव झाल्यामुळे मात्र अशक्तपणा येतो. रक्ताचे प्रमाण कमी होऊन चेहरा निस्तेज, पांढुरका दिसावयास लागतो. उत्साह कमी होतो. सुस्ती येते चिडचिडेपणा वाढतो. अ‍ॅनिमियाची सर्व लक्षणे दिसू लागतात. त्याशिवाय अतिस्रावामुळे दैनंदिन जीवन सुरळीत रहात नाही. स्त्रीवर असंख्य मर्यादा येतात.

उपचार- उपचार हा मूळ कारणावरच करावा लागतो. तरच लक्षणं आटोक्यात येतात. एकंदरीतच सर्व मासिक आवर्त विकारांवर होमिओपॅथिक उपचार अतिशय प्रभावी आहेत. ही औषधे हार्मोनयुक्त नसल्याकारणाने या उपचारांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

होमिओपॅथी

अमोनियम कार्ब- रक्तस्राव सुरू होण्याआधी अतिसार, जुलाब होतात. स्राव लवकर चालू होतो व भरपूर असतो. त्याआधी भयंकर मुरडा येतो, स्राव खरबडणारा उष्ण असतो. रात्री किंवा बसलेलससे असताना अंगावर भरपूर जाते. मांड्यामध्ये गोळे येतात. सारख्या जांभया येतात, अंगावर शहारे येतात.

मॅग कार्ब- विटाळापूर्वी (स्रावापूर्वी) घशाचे त्रास, प्रसूतीसारख्या वेदना होतात. कापल्यासारख्या, खरवडल्यासारख्या वेदना होतात. पाठ दुखते, अशक्तपणा वाटतो, अंगावर रात्री किंवा झोपल्यावर फार जाते. चालत असताना स्राव जरा थांबतो स्राव दाट, खरवडणारा असून कापडावरचे डाग धुवूनसुध्दा जात नाहीत.

सायक्लामेन- रक्तस्राव अतिश होतो. एका मासिक पाळीच्या वेळेस खूप स्राव9 होतो तर दुसर्‍या पाळीत कमी होतो. असे आलटून पालटून होत राहते. पाळीच्या वेळी उलट्या होतात. मोठ्या मोठ्या रक्ताच्या गाठी स्रावात दिसून येतात.

युस्टिलॅगो- सतत रक्तस्राव, लालभडक रक्तगाठी स्रावात दिसतात. गर्भपात झाल्यासारखा स्राव होतो. जराही हालचाल झाली तरी स्राव वाढतो.

अशी अनेक औषधं लक्षणानुसार वापरता येतात. रूग्णांनी सर्व लक्षणं, बाारीक सारीक माहिती होमिओपॅथीक तज्ज्ञांना देणे जरूरीचे असते. त्यामुळे प्रभावी उपचार शक्य होतात.

आहार उपचार/ निसर्गोपचार

आंबायाच्या झाडाची साल- सालीचा रस व अंड्यातील बलक यांचे एकास एक मिश्रण घालून घ्यावे किंवा झाडापासून मिळणारा डिंक व तूप घालून खावे अति रक्तस्राव कमी होतो.

बीट, गाजर, भोपळा व अजमोदा या चार भाज्यांचा प्रत्येकी अर्धाकप रस एकत्र करून कायम प्यायल्याने पाळीचे विकार कमी होतात.

केळफूल- उकडलेले केळफूल व दही एकत्र करून खावे. केळफुलामुळे प्रोजेस्टेरॉन होर्मोनची पातळी वाढून स्राव कमी होतो.

इंडियन बार्बेरी- जास्त प्रमाणात रक्त जात असल्यास या वनस्पतीचे 25 ग्रॅम वाटण पोटात घेतल्याने स्राव कमी होतो.

अनेक स्त्रिया मासिक आवर्तविकार उपचाराविना सहन करत असतात. लज्जेस्तव डॉक्टरांकडे जात नाहीत. परंतु विकाराने उग्ररूप धारण करण्याआधीच तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याने आरोग्याची हानी टाळली जाते.

मासिक आवर्तविकार ‘प्रीमेन्स्ट्युअल टेन्शन सिंड्रोम’

स्त्रियांमध्ये ‘एस्ट्रोजेन’ व ‘प्रोजेस्टेरॉन’ ही दोन महत्वाची हार्मोन्स असतात. बिजांडकोषातून, यकृतातून या हार्मोन्सची निर्मिती होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून मुलीच्या रक्तामध्ये एस्ट्रोजेन हे हार्मोन मोठ्या प्रमाणात मिसळू लागते. त्यामुळे त्यांची झपाट्याने वाढ होते. मुलगी वयात आल्याची लक्षणे जाणवू लागतात. साधारणतः प्रत्येक 28 ते 30 दिवसानंतर तिच्या शरीरातून ऋतुस्राव थांबणे किंवा प्रमाण वाढणे इत्यादी अनेक तक्रारी स्त्रियांमध्ये आढळून येतात.

संपर्क-
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक-9916106896
सरनोबत क्लिनिक-9964946818

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.