Thursday, April 25, 2024

/

बालकाचा तुटलेला जबडा शस्त्रक्रियेने जोडला

 belgaum

अपघात जखमी दत्तू गुरव नामक सहा वर्षीय बालकाचा तुटलेला जबडा आणि दात शस्त्रक्रिये द्वारे पुन्हा तोंडावर बसवण्याची यशस्वी शस्त्रक्रिया शहरातील विजय आर्थो आणि ट्रॉमा सेंटर मध्ये करण्यात आली आहे.
गेल्या 13 जून रोजी खानापूर तालुक्यातील बेटगेरी गावात सहा वर्षीय बालकाचा खेळताना अपघात होऊन तोंडावर मार बसून जबडा,दात बाहेर पडले होते. जखमी बालकाच्या दवडीचा काही भाग शरीरा पासून वेगळा झाला होता तो भाग घेऊन पालक दवाखान्यात दाखल झाले होते  तो भाग पुन्हा जोडून यशस्वी ऑपरेशन करण्यात आले आहे.

ravi-patil-press-meet-
विजय आर्थो ट्रॉमा सेंटरचे डॉ कौस्तुभ देसाई यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या पथकाने  बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.ऑपरेशन होताच बालकाला पदार्थ देखील खायला देण्यात आले आहेत.अश्या प्रकारचे उत्तर कर्नाटकातील हे पहिले ऑपरेशन आहे.
विजय ऑर्थो आणि ट्रॉमा सेंटरच्या डॉ रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सदर शस्त्र क्रिये बद्दल माहिती दिली. कोणताही अपघात होऊन मानवी शरीराच्या भागाचा बाजूला आलेला तुकडा ऑपरेशनने जोडता येऊ शकतो.अपघात झालेल्या दोन ते सहा तासांच्या कालावधीत शरीराचा भाग जोडला जाऊ शकतो कोणतीही घटना अपघात झाल्यास लोक केवळ माणसाला इस्पितळात दाखल करतात मात्र तुटलेला त्याच्या शरीराचा भाग आणला जात नाही मात्र तसे न करता दोन्ही सोबतआणल्यास जोडता येऊ शकते हे वरील उदाहरणा वरून दिसून येते.
डॉ कौस्तुभ देसाई ,डॉ हालेश,डॉ श्रीधर,डॉ शशिधर, बसवराज यांच्यासह अन्य पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.