सर्वत्र इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याचे फॅड आले आहे. जो तो आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत दाखल करू लागला आहे. मराठी किंवा मातृभाषेतून शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. पण कुणीच तिकडे लक्ष द्यायला तयार नाही. म्हणूनच मुचंडी येथील सरकारी शाळेने मराठी शाळा वाचवा अभियान सुरू केले आहे.
२०१८ व २०१९ वर्षापासुन म्हणजे आत्तापासुनच सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये साडेतीन वर्षापुढील मुलांना एलकेजी व युकेजी वर्ग भरविले जात आहेत.यामध्ये मराठी, इंग्लीश, कन्नड या तिन्ही भाषेचे शिक्षण दिले जाणार असुन सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या आणि दर्जात्मक शिक्षणासाठी आपल्या नजीकच्या मातृभाषेच्या सरकारी प्राथमिक शाळेतच पाठवा असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर शाळांनीही हा आदर्श घेऊन काम केले तर बरे होईल.