Friday, September 13, 2024

/

प्रेरणा गोंबारे थिरकणार स्पेन डान्स वर्ल्ड कप मध्ये

 belgaum

स्पेन देशाच्या बारसेलोना भागातील सीटजस येथे २२ ते ३० जून पर्यंत डान्स वर्ल्ड कप होणार आहे. या भल्यामोठ्या नृत्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व एक मुलगी करणार आहे. तिचे नाव आहे प्रेरणा गोंबारे. विशेष हे की ती बेळगावची आहे.

prerana
२०१५ पासून एम स्टाईल डान्स एन डी फिटनेस अकॅडमी मध्ये ती नृत्याचे शिक्षण घेत आहे. वनिता विद्यालय इंग्लिश शाळेत नववीच्या वर्गात ती शिकते.
डान्स वर्ल्ड कप मध्ये ४ ते २५ वयोगटातील जगभरातील १२००० स्पर्धक दाखल होत आहेत.
खरेतर बेळगाव मधील सहा जण या वर्ल्ड कप साठी निवडण्यात आले होते. पण स्पेन ला जाण्यासाठी खर्च करण्याची क्षमता नसल्याने त्यांनी माघार घेतली. आता प्रेरणा, तिची आई आणि कोरिओग्राफर इतकेच स्पेन ला जाणार आहेत. त्यांनाही सहा लाख रुपये खर्च येणार असून त्यासाठी मदत जमवणे सुरू आहे.
प्रेरणा ला साता समुद्रापार जाऊन बेळगावचे नाव रोशन करण्याची संधी देण्यासाठी मदतीची गरज आहे. मदत देऊ इच्छिणाऱ्यांना ८१०५६३५४२८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.