बेळगावचे युवा उद्योजक शैलेश जोशी यांनी काल स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आपल्या मृत्यूस आपणच जबाबदार असे लिहून ठेवताना जाता जाताही काही सामाजिक संस्थांसाठी जोशी मदत देऊन गेले आहेत, आजारपण आणि मानसिक त्रासानेच त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे.
शैलेश जोशी हे सामाजिक कार्यात आघाडीवर होते. त्यांनी अनेक कामे केली आहेत. अनेक कामांना आर्थिक मदत केली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. पण वागण्यात साधेपणा होता, दुसऱ्याच्या हाकेला ओ देऊन पुढे जाणारे व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध होते, पोटदुखी अधिक वाढली म्हणून त्यांनी काही ठिकाणी उपचार घेतले, पण शेवटी स्वतःला संपवून घेण्याची मानसिकता तयार झाली. तरीही आपल्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी मदत करून मरण्याची भावना ठेवली आहे. काही संस्थांना त्यांनी आपल्या खात्यातून लक्षावधी रुपये देण्याची सूचना शेवटच्या लिखाणात केली आहे.
संसाराचा रथ योग्य पुढे जायचा असल्यास दोन्ही चाके महत्वाची असतात. हा रथ ओढताना ते मानसिकरित्या खचले होते असेही त्यांच्या सुसाईड नोट वरून समोर आले आहे. सर्वच गोष्टी उघड करणे अशक्य असले तरी एका यशस्वी उद्योजकाचा शेवट हा संसारात अपयश आल्याने झाला हे नक्की आहे, आत्महत्या हा समर्थनाचा विषय नाही यामुळे कुणीही तसा प्रयत्न करू नये, यासाठी आता प्रयत्नांची गरज आहे.