Thursday, May 2, 2024

/

जेंव्हा …ट्रॅफिक पोलीस करतो पालिकेचे काम

 belgaum

शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य बनले आहे हेच खड्डे चुकवताना अनेक अपघात होत आहेत बऱ्याच ठिकाणी खड्ड्यामुळेच ट्रॅफिक जॅमच्या समस्या उदभवत आहेत .
शहरातील रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली असताना ट्रॅफिक पोलिस महा पालिकेचे काम करताना दिसत आहे  दुचाकी स्वारांचा अपघात होऊ नये म्हणून चन्नम्मा चौकातील खड्डे बुझवण्याचं काम रहदारी विभागातील एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी बसवराज सिंदगार यांनी केलं आहे.

TRaffic sindgar
शहरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी त्यातच  हेस्कॉमने भूमिगत वीज वाहिन्यासाठी अगोदरच अनेक ठिकाणी रस्त्यात खुदाई केली केली आहे त्यामुळे देखील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे अश्यात पालिका प्रशासना ऐवजी या प्रामाणिक पोलिसांने खड्डे बुझवण्याचं केलेले कार्य सराहनिय आहे.
रहदारी नियंत्रणासाठी तसेच इतर ठिकाणी त्यांनी केलेल्या कामाची दखल पोलीस दलाने व नागरी पातळीवरही घेण्यात आली आहे. सध्या ब्रिज बांधकामामुळे रहदारी समस्या निर्माण झाली असतानाही दुसऱ्या रेल्वे गेट जवळ रहदारी नियंत्रणाच्या बाबतीत सिंदगार यांनी सुरू ठेवलेल्या नियोजनबद्ध कामामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

TRaffic pc
ट्रॅफिक मधील योगदानाची दखल बेळगाव live ने देखील घेतली होती त्यांना वर्ष पूर्ती निमित्य दिल्या गेलेल्या पुरस्कारात उत्कृष्ट पोलीस अधिकारी या क्षेत्रात नामांकन दिले होते.आज त्यांनी चन्नम्मा चौकात खड्डे बुजवून आपलं नामांकन योग्य होत हेच दाखवून दिलं आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.