Friday, April 26, 2024

/

कामगारांना रोजगार द्या ; आर रामचंद्रन

 belgaum

पावसाळा जवळ आला आहे. त्यामुळे उद्योग खात्रीतील कामगारांना रोजगाराची कामे द्या . अशी सूचना जिल्हा पंचायतीचे सीईओ आर रामचंद्रन यांनी दिली आहे. दररोज सॅटेलाइटवरून सायंकाळी ५ ते ६ यादरम्यान सर्व तालुका अधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत.

ramchanran rao
सध्या कामगारांना काम मिळत नाही त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने त्यांना काम देण्यासाठी झटले पाहिजे. महत्वाचे म्हणजे जे काम करण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांची जॉब कार्डे काढून त्यांनाही कामे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा.असेही सेटलाइटवरून सांगण्यात आले आहे.
दररोज सायंकाळी ५ते ६ यावेळेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात येत आहे. ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना काम उपलब्ध करून द्या . राज्यात बेळगाव जिल्हा प्रथम आहे. तो प्रथम ठेवण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक तालुक्यात दिलेले लक्ष्य पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.