belgaum

मेष: व्यावसायिक स्थिती चांगली राहील. परंतु निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नौकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेतून यश मिळेल. सरकारी कामात सहज यश मिळणार नाही. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. रागांवर नियंत्रण ठेवावे. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २७, २८.

bg

वृषभ: उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीत जबाबदारीत वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. संततीमुळे खर्चाचे प्रमाणात वाढ होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात यश प्रयत्नाने मिळेल. भावंडांच्या बाबतीत अडचणी येतील. मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २७, २८, २९, ३०.

मिथुन: व्यावसायिक आर्थिक अंदाज अचूक ठरतील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध कामाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत चांगल्या वार्ता समजतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. वैयक्तिक कामात यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवासातून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. २९, ३०, ३१, १, २.

कर्क: संततीला स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. व्यावसायिक आवक मंदावेल. खर्चाचे प्रसंग येतील. नौकरीत वरिष्ठांची साथ लाभेल. प्रवासामधून संमिश्र सफलता मिळेल. मित्र-मंडळींच्या ओळखीतून फायदा मिळेल. शुभ ता. ३१, १, २.

सिंह: व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये नियोजित कामे यशस्वी होतील. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या कार्यात सहभाग घडेल. शुभ ता. २७, २८.

कन्या: उद्योग-व्यवसायात आर्थिक चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये कामाचा व्याप वाढेल. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश लाभेल. प्रवासामधून कामे विलंबाने होतील. मित्रांवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २९, ३०.

तूळ: व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडीचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. स्थावराचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २७, २८, ३१, १, २.

वृश्चिक: उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता. जोडीदाराच्या हट्टी निर्णयाचा त्रास होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २९, ३०.

धनु: व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या नौकरी विषयक कामात अडथळे येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. मित्रांची साथ मिळेल. प्रवास लाभदायक ठरवील. शुभ ता. २७, २८, ३१, १, २.

मकर: उद्योग-व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण घटेल. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. संततीच्या बाबतीत नवीन संधी येतील. विद्यार्थांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. अविचारी निर्णय शक्यतो घेऊ नयेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य
लाभेल. शुभ ता. २७, २८, २९, ३०.

कुंभ: व्यावसायिक स्थिति मनासारखी राहणार नाही. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या विवाहासंबंधी कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. पचनाचे विकार त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींचे सहकार्य चांगले मिळेल. शुभ ता. २९, ३०, ३१, १, २.

मीन: उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीत ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. आर्थिक निर्णय विचारपुर्वक घ्यावेत. संततीच्या कामात व्यत्यय निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. भावंडांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ३१, १, २.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.