Friday, May 3, 2024

/

निलजी गावच्या नाम फलकावर नम्म बेळगावी

 belgaum

निलजी येथे काल रात्री अज्ञात समाजकंठक यांच्याकडून गावाच्या नामफलकावर नम्म बेळगावी असा संदेश लिहिण्यात आला आहे.
ग्राम पंचायतीने सांबरा रोड वर दिशादर्शक मराठी -कन्नड फलक उभा केला आहे . या फलकातील फक्त मराठी मजकुराला काळे फासून ‘नम्म बेळगावी ‘असा मजकूर लिहिला गेला आहे.

NIlji
मराठी बहू भाषिक गांवात भाषिक तेढ निर्माण करून राजकिय फायदा उठवायला राष्ट्रीय पक्षांचा हा प्रयत्न असून मराठी व कन्नड भाषिकात तेढ निर्माण करण्यात आली आहे. याचा तीव्र निषेध केला जात आहे .
मराठी स्वाभिमान जपणाऱ्या बेळगांव ग्रामीण पूर्व भागात ही घटना घडल्यामुळे मराठी संस्कृती , आस्मिता पुसण्याचा घाट आहे .असा आरोप होत आहे.
मराठी भाषिकांनी याची दखल घेऊन निषेध केला पण पोलीस अधिकारी व निवडणूक आयोगाने आरोपींचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.