पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा गेले पण जाताना हेल्मेट सक्तीचा आदेश पाठीमागेच सोडून गेले आहेत. भर उन्हात घाम पडत असताना हेल्मेट घातले नाही म्हणून रहदारी पोलीस दंड लावण्यात सक्तीत गुंग आहेत.
शहर भागात उन्हाळ्यात तरी हेल्मेटसक्ती नको म्हणून नागरिक ओरडत आहेत, पण पोलिसांना दंड वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. परिणामी हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जोरात आटापिटा सुरू आहे.
निवडणुकीच्या वातावरणात प्रचाराच्या घाईत असलेल्या कार्यकर्त्यांना अंगावरील कपड्यांची शुद्ध नाही. हेल्मेट तर दूरची गोष्ट झाली पण हे महागात पडत असून दंड भरून पुढे जायला लागत आहे.
Trending Now