belgaum

बेळगावची सई लोकूर ही अभिनेत्री सध्या बिग बॉस मराठी मध्ये आपली छाप उमटवत आहे. सर्वात लहान वयाची सदस्य असली तरी सर्व टास्क मध्ये ती आघाडीवर आहे. यामुळे बेळगावचा मान आणि शान ती वाढवत आहे.

sailokur
सई लोकूर ही अखिल भारतीय नाट्यपरिषद बेळगाव शाखेच्या अध्यक्ष वीणा लोकूर यांची मुलगी आहे. वीणा यांनीच निर्मिती केलेल्या मिशन चॅम्पियन चित्रपटातून तिने पदार्पण केले. कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्या पहिल्याच चित्रपटात तिला भूमिका मिळाली. अनेक सीरिअल्स आणि फिल्म मधून तिने काम केले आहे.
बिग बॉस सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्यात मराठी बिग बॉस मराठी माणसाच्या आवडीचे ठरले आहे. त्यात बेळगावच्या सई चा समावेश ही अभिमानाचा विषय आहे. आणि सई आपली छाप पाडत आहे म्हणून सगळ्यांना मराठी बिग बॉस बघायलाच पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.