महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिणचे उमेदवार श्री किरण सायनाक यांना पाठींबा जोरात आहे. सगळीकडे त्यांनाच निवडून देण्याची भाषा जनता करत आहे.किरण सायनाक यांच्या प्रचारार्थ अनगोळ भागात काळ प्रचार फेरी झाली. संध्याकाळी शहापूर भागातही पदयात्रा काढण्यात आली. एकीच्यमया मुद्द्यावर काही भागात नाराजी असली तरी किरण सायनाक यांना मानणाऱ्या लोकांनी त्यांना साथ दिली आहे.
अनगोळाची ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिर येथून सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी श्री महालक्ष्मी मंदिर येथे किरण सायनाक यांच्या वतीने आरती करण्यात आली. पुष्पहार घालून श्रीफळ वाढवून पुजन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, संयुक्त महाराष्ट्रची घोषणा, किरण सायनाक आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, अश्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला गेला.
यानंतर ही पद यात्रा गांधी स्मारक लक्ष्मी मंदिर, जय महाराष्ट्र चौक, रेणुका देवी मंदिर, हणमण्णावर गल्ली, कलमेश्वर मंदिर, मरगाई मंदिर, राजहंस गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, बाबले गल्ली, मुस्लिम गल्ली, बडमंजी नगर, नाथ पै नगर, लोहार गल्ली, मारूती मंदिर मारुती गल्ली, भांदूर गल्ली आणि जय महाराष्ट्र चौक येथे मिरवणूक समाप्त करण्यात आली. यावेळी गावातील सर्व युवक मंडळ, पंच कमिटी, यांनी भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.शहापूर भागातही असाच पाठींबा मिळत आहे. खडेबाजार शहापूर आणि सर्वच गल्लीत सायनाक यांना निवडून देण्याचा निर्धार केला आहे.