बालगणेश मंडळ नार्वेकर गल्ली शहापूर आणि समस्त नागरिकांनी समिती नेत्यांना एकीचा शेवटचा इशारा दिला आहे. एकी न झाल्यास मतदानावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्यवर्ती आणि शहर समिती ची एकी होऊन जर १ उमेदवार दिला तर मतदान करणार नाहीतर नोटा हा पर्याय निवडणार असा निर्णय घेण्यात आला आहे.
आज सायंकाळी बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. नार्वेकर गल्ली येथील समिती निष्ठ कार्यकर्ते सागर पाटील यांनी समिती नेत्यांना अलटीमेटम देण्यात आला आहे.
समितीचे दोन्ही गट एकमेकां विरोधात कुरघोडी करत असताना एकी साठी आता जनतेतून दबाव वाढत आहे.