Thursday, March 28, 2024

/

उद्या ११ वाजता संभाजीराव पाटील भरणार अर्ज

 belgaum

बेळगाव दक्षिण आणि उत्तर आशा दोन्ही मतदारसंघांसाठी आमदार संभाजीराव पाटील उद्या सकाळी आपले उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला दोन पैकी एक मतदारसंघात संधी मिळणार असून उत्तर साठी आपले प्रयत्न जास्त आहेत असे त्यांनी बेळगाव live ला सांगितले आहे.

sambhaji patil
टायगर जिंदा है च्या या घोषणेने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. संभाजीराव पाटील हे उत्तर मतदारसंघात अर्ज भरणार याची घोषणा होताच अनेकांची चलबिचल सुरू झाली आहे.
चार वेळा महापौर या नात्याने त्यांनी संपूर्ण बेळगाव शहरासाठी योगदान दिले आहे. अमान नगर ची उभारणी, आझादनगर मधील समस्यांची सोडवणूक, संवेदनशील भागात शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न, गांधीनगर येथे पहिली उर्दू शाळा आणि हिडकल धरणाचे पाणी बेळगावला आणून सोडवलेला पाणी प्रश्न यामुळे बेळगाव उत्तर मतदार संघातील मराठी, कन्नड, मुस्लिम आणि इतर भाषिकात ते लोकप्रिय आहेत.
यामुळे इतर भाषिक व धर्मीयांची त्यांना उत्तर मध्ये येण्यासाठी मागणी वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.