Friday, April 19, 2024

/

बनावट नोटांचा साठा सापडला

 belgaum

बेळगाव पोलिसांनी काल मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे.छाप्यात आढळलेल्या नोटा ५ कोटीच्या आहेत.

५०० आणि २००० च्या बनावट नोटांचा साठा मध्यरात्री बेळगाव पोलिसांनी जप्त केला आहे.या नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसतात. सदाशिवनगर मधील पी डब्ल्यू डी कॉटर्स मधील एका घरात हा साठा सापडला आहे. निवडणुकीत वाटण्यासाठी या नोटा आणलेत की काय असा संशय आहे.
पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्या नेतृत्वाखाली माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली. मोठ्या बंदोबस्तात पहाटे पर्यंत मोजदाद सुरू होती.
घरात एका तिजोरीत या बनावट नोटांचा साठा करण्यात आल्याचे दिसून आले . निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही दाखल होऊन रात्री उशीरा पर्यंत पंचनामा केला.
या नोटा कुठे छापल्या आणि कुणासाठी वाटणार होते याचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.