Thursday, April 18, 2024

/

बायकोची नोकरी आमदाराच्या अंगलट?

 belgaum

खानापूर तालुक्यातील कन्नड आणि मराठी मतदारांची आमदार अरविंद पाटील यांनी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. मागील निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना आपली पत्नी सरकारी नोकर असल्याचे अरविंद पाटील यांनी लपवून ठेवले होते. माहिती हक्काच्या आधाराखाली ते प्रकरण उघडकीस आले आहे.ARVInd patil
२०१३ च्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी निवडणूक आयोगाला आपली माहिती देताना ही माहिती लपवून ठेवली होती. अरविंद पाटील यांची पत्नी सरकारी खात्यात शिक्षण विभागात शिक्षक म्हणून काम करतात, पत्नी कर्नाटक सरकारची पगारदार आहे असे समजले तर मराठी लोक उमेदवारी देणार नाहीत अशी भीती वाटून त्यांनी ही माहिती लपवल्याचा आरोप होत आहे.
प्रतिज्ञापत्र देताना अरविंद पाटील यांनी आपल्या पत्नीचे काहीच आर्थिक स्रोत नाहीत असे लिहून इंग्रजीत नील असा उल्लेख केला आहे. आपली पत्नी आयकर भरत असताना करदाती नाही अशी खोटी माहिती देण्यात आली आहे. कोणतेच बँकिंग व्यवहार नाहीत अशी पुरवण्यात आलेली माहितीही खोटी ठरली आहे, त्यांच्या पत्नीचे स्टेट बँक ऑफ इंडिया हुक्केरी शाखेतील ६४०२२५९१५१४ या खात्याचे सर्व आर्थिक व्यवहारही उघड करण्यात आले आहेत.
याबद्दल तक्रारी झाल्याने आयकर खात्याने चौकशी करून अहवाल निवडणूक आयोगाला दिला आहे.
आयोगाने हा अहवाल जिल्हा निवडणूक आयोगाकडे दिला आहे.
या फसवणुकी बद्दल फोजदारी गुन्हाही दाखल झाला आहे. आता जर यावेळी निवडणूक तिकीट मिळाले तर अरविंद पाटील यांना खरी माहिती द्यावी लागेल, यातून त्यांनी मागे फसवणूक केल्याचे उघड होईल, यामुळे बायकोची नोकरी आमदाराच्या अंगलट आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.