Friday, September 20, 2024

/

राम राम पावनं…अप्पानू लवकर दून मोकळं करा….तिकीट

 belgaum

अगा आमच्या जिवातला जीव जाऊस येलाय, काय बी करा ती एकदाची तिकिटं दून मोकळी करा, हेच माजं सांगनं हाय, तरनी पोरं आपल्या आपल्या सायबास तिकीट मिळोचं म्हणोन देव पाण्यात घालून बसल्याताय, त्यांचा जीव घेतलं काम करूनकाशी, यवंडच माज सांगतलं हाय.

ते भाजप वाले तर तिकिटास सोनं लावून ठेवल्यागत करूल्याताय. पैला एक यादी, मानं दुसरी यादी असं करीत जीवास घोर लावंतलं काम चाललाय, तरबी कायबी करोन निवडणुकीस कोण हुबे करनार ते तरबी लवकर सांगोन टाका आमचे कार्यकर्ते खायम उगेचबी गुलाल उधळोन टाकून रस्ते लाल करूल्यात.
कांग्रेस पक्षान तवडं चांगली बात करल्यानाय उमेद्वारांची नावं मोकळी करून टाकलानाय, आजून समितीचं कायबी ठरेना झालाय, ते बी ठरवा ,
अप्पानू लवकर दून मोकळं करा….तिकीट

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.